33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeआरोग्यउन्हाळ्यात आवर्जून खा काकडी; जाणून घ्या फायदे

उन्हाळ्यात आवर्जून खा काकडी; जाणून घ्या फायदे

काकडी (Cucumber) एक असा खाद्य पदार्थ आहे जो पुर्ण भारतात सहज मिळतो. काकडी शरीराला शीतलता आणि ताजेपणा प्रदान करते. याला तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. जेसे सलाड, सँडवीच, किंवा तिखट मिठ लावुन खाऊ शकता. काकडीचे सेवन (Eating Cucumber) करणे हे शरीरासाठी फायदेशीर (good for health) मानले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यापासून ते अनेक पोषक तत्वांची प्राप्तता होण्यासाठी काकडी खाणे लाभदायक ठरते. काकडीमध्ये कॅलरी, फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडिअम इत्यादीचे प्रमाण कमी असते. जे आपल्या शरीरासाठी अनेक प्रकार फायदेशीर ठरते. तर जाणून घेऊयात काकडीचे फायदे.(Cucumber Health Benefit eat them every day)

पोषक घटक

काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात. त्याशिवाय काकडीमध्ये आवश्यक पोषक घटक आहेत. डॉ. बत्रा सांगतात, “काकडी व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम व मॅग्नेशियम यांचा चांगला स्रोत आहे. आरोग्य चांगले ठेवण्यास काकडी महत्त्वाची भूमिका बजावते.

पचनक्रिया सुधारते

काकडीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते; जे पचनासाठी अतिशय फायदेशीर आहे. काकडीच्या सेवनाने तुम्ही बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करू शकता.

वजन नियंत्रण

काकडीमध्ये पाण्याची अधिक मात्रा आणि फायबरचे भरपूर प्रमाण असते. अशा काकडीचा जेव्हा आपण आहारात समावेश करतो तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या वजन नियंत्रणावर होतो.

त्वचा उजळते

काकडी एक असा पदार्थ आहे जो त्वचेला विविध प्रकारच्या समस्यापासुन दूर ठेवण्यात मदत करते. जसे की, टॅनिंग, सनबर्न, रॅशेज आदि. रोज काकडी खाल्याने रुक्ष त्वचेत ओलावा पुन्हा येतो. यामुळे हे नॅचरल मॉश्चरायजरचे काम करते. हे त्वचेतील तेल काढण्याची प्रक्रिया कमी करुन पिंपल्स येणे कमी करते.

ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करते

काकडी खाल्ल्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी करायला आणि डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स कमी करायला मदत करतात. काकडीच्या रसामध्ये अशी तत्वे असतात जे पॅनक्रियाजला सक्रिय करतात. पॅनक्रियाज सक्रिय झाल्यामुळे शरीरामध्ये इन्शुलिन तयार होते. यानंतर इन्शुलिन डायबिटीसशी लढायला मदत करते. काकडीमध्ये असलेले फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये ठेवायला मदत करते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी