28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeआरोग्यनाशिक महा-आरएसएसडीआय २०२४’ परीषद शनिवारपासून डॉ.नारायण देवगांवकर

नाशिक महा-आरएसएसडीआय २०२४’ परीषद शनिवारपासून डॉ.नारायण देवगांवकर

रिसर्च सोसायटी फॉर दी स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया यांच्या वतीने महा-आरएसएसडीआय २०२४ या राष्ट्रीय स्तरावरील परीषदेचे नाशिकमध्ये आयोजन केले आहे. ही १८ वी वार्षिक परीषद येत्या १७ आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सुला येथे पार पडणार असून, या परीषदेस देशभरातील ६०० मधुमेह तज्ज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष तथा परीषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.नारायण देवगांवकर यांनी दिली.रिसर्च सोसायटी फॉर दी स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडियाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्षपद डॉ.नारायण देवगांवकर यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली ही परीषद पार पडते आहे.

रिसर्च सोसायटी फॉर दी स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया यांच्या वतीने महा-आरएसएसडीआय २०२४ या राष्ट्रीय स्तरावरील परीषदेचे नाशिकमध्ये आयोजन केले आहे. ही १८ वी वार्षिक परीषद येत्या १७ आणि १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सुला येथे पार पडणार असून, या परीषदेस देशभरातील ६०० मधुमेह तज्ज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष तथा परीषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.नारायण देवगांवकर यांनी दिली.रिसर्च सोसायटी फॉर दी स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडियाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्षपद डॉ.नारायण देवगांवकर यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली ही परीषद पार पडते आहे. या दोन दिवसीय परीषदेविषयीची माहिती देतांना डॉ.देवगांवकर म्हणाले, 80 हून अधिक दिग्गज तज्ज्ञ मान्यवर सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. १७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ पार पडेल. यावेळी महाराष्ट्र शाखेचे पदाधिकारी उपस्थित राहातील.

या दोन दिवसीय परीषदेत विविध विषयांवर चर्चा घडविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने टाईप-१ डायबेटिसवरील उपचारातील आधुनिकता, युवा पिढीमध्ये आढळणारा मधुमेहःजागतिक आव्हान, इन्सुलिनसंदर्भातील विविध विषय, औषधोपचारातील आधुनिक तंत्रज्ञान, मधुमेहामुळे श्रवण क्षमता घटणे, मधुमेहातील आहार, टाइप २ मधुमेहाची सद्यःस्थिती यांसह सध्याच्या काळाला सुसंगत असे मधुमेहाच्या उपचारात चॅटजिपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग, कृत्रिम गोड (आर्टिफिशियल स्विटनर्स)ः किती सुरक्षित अशा विविध विषयांवर मंथन केले जाणार आहे.

या परीषदेसाठी मार्गदर्शक म्हणून डॉ.विजय पनीकर, डॉ.शशांक जोशी, डॉ.संजीव इंदूरकर, परीषद आयोजन समितीचे सह-अध्यक्ष डॉ.समीर शाहा, आयोजन समिती सचिव डॉ.समीर चंद्रात्रे, सहसचिव डॉ.समीर पेखळे, डॉ.रमेश पवार, सायंटिफिक कमिटीचे अध्यक्ष डॉ.यशपाल गोगटे, सहअध्यक्ष डॉ.मनोज चितळे, खजिनदार डॉ.राहुल पाटील, सहखजिनदार डॉ.विजय धोंडगे, सहखजिनदार डॉ.किरण बिरारी, समन्वयक डॉ.सुवर्णा तांबडे, डॉ.मृणालीनी केळकर हे जबाबदारी सांभाळत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी