गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत कायाकल्प स्पर्धेत राज्यात नाशिक महानगरपालिकेचे शहरी सामुदायिक आरोग्य केंद्र गटात मोरवाडी येथील श्री. स्वामी समर्थ रुग्णालयास महाराष्ट्र राज्यात प्रथम पारितोषिक ( रुपये १५ लाख) मिळाले असून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयास प्रोत्साहनात्मक बक्षिस (रुपये १ लाख) मिळालेले आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत नाशिक महानगरपालिकेचे सर्व शहरी प्राथमिक व शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये कायाकल्प हा कार्यक्रम राज्य शासनाचे दिलेल्या मार्गदर्शनानुसार व मुल्यमापन चेक लिस्टनुसार राबविण्यात येतो. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत रुग्णालयातील सुविधा आणि देखभाल व स्वच्छता, जसे वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व संसर्ग नियंत्रण सेवा आदि घटकांचे दरवर्षी मुल्यमापन करुन उत्कृष्ठ केंद्रांना कायाकल्प कार्यक्रमांतर्गत दरवर्षी बक्षिस दिले जाते.Nashik nashik NMC Morwadi Hospital tops in state
आरोग्य विभागाचे आयुक्त धिरज कुमार
यांनी सोमवारी पुरस्कार प्राप्त आरोग्य केंद्राची माहिती जाहीर केली.
—————–
शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र गटात ,मायको सातपूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र यास प्रथम पारितोषिक
( रुपये ०२ लाख) जाहिर करण्यात आले आहे. तसेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दसक-पंचक यांना प्रथम उपविजेते
( रुपये १.५ लाख) व इतर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिजामाता, सिन्नर फाटा, सिडको, संजिवनगर, मायको
पंचवटी, मखमलाबाद, हिरावाडी,पिपळगाव खांब,गंगापुर गाव,एचएमबी कॉलनी यांना प्रति रुग्णालयांना ५०
हजार रुपये प्रोत्साहन बक्षिस जाहिर केले आहे. असे नाशिक महानगरपालिकेचे एकुण १४ रुग्णालयांना वर्ष २०२२-२३ अंतर्गत २४ लाख ५० हजाराचे बक्षिस घोषित करण्यात आले आहे. याकरीता आयुक्त तथा प्रशासक मा. डॉ. अशोक करंजकर, अति. आयुक्त
(सेवा) स्मिता झगडे यांचे मार्गदर्शन लाभले. या पारितोषिकामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाचे
पैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण तसेच सहा.वैदयकिय आरोग्य अधिकारी, डॉ. अजिता साळुंके व शहर
गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. हिना शेख व सर्व अधिकारी कर्मचा-यांनी मेहनत घेतली आहे.
——————–
सर्व डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचा-यांचे संयुक्त सहकार्याने रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळेल
यासाठी आम्ही कटिबंध आहे. शहरी वासियांचे आरोग्य सुधारण्याकरीता यापुढे ही प्रयत्न सुरु राहणार आहोत.
-डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
सर्व डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचा-यांचे संयुक्त सहकार्याने रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळेल
यासाठी आम्ही कटिबंध आहे. शहरी वासियांचे आरोग्य सुधारण्याकरीता यापुढे ही प्रयत्न सुरु राहणार आहोत.
-डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा