33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeराजकीयनाशिक सिटिलिंक संप मनसेचा आंदोलनाचा इशारा

नाशिक सिटिलिंक संप मनसेचा आंदोलनाचा इशारा

गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेल्या सिटिलिंक बसेसमुळे नागरिकांचे हाल होत असून बस दोन दिवसात सुरू कराव्यात अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्यावतीने सोमवारी देण्यात आला. याबाबत आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी लवकरात लवकर बस सुरू करण्याचे आश्वासन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, या संपामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह चाकरमाने, महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहे. रिक्षाचालक सर्वसामान्य नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारत आहेत. त्यामुळे त्यांना या दरवाढीचा फटका बसत आहे. ऐन दुपारच्या उन्हात विद्यार्थी, चाकरमान्यांचे हाल होत आहे.

गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेल्या सिटिलिंक बसेसमुळेMNS नागरिकांचे हाल होत असून बस दोन दिवसात सुरू कराव्यात अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्यावतीने< MNS nashik> सोमवारी देण्यात आला. याबाबत आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी लवकरात लवकर बस सुरू करण्याचे आश्वासन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, या संपामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह चाकरमाने, महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहे. रिक्षाचालक सर्वसामान्य नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारत आहेत. त्यामुळे त्यांना या दरवाढीचा फटका बसत आहे. ऐन दुपारच्या उन्हात विद्यार्थी, चाकरमान्यांचे हाल होत आहे.

आयुक्तांना काळी शाई व पादत्राणांचा जोड भेट देण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सलिम शेख, जिल्हाध्यक्ष रतन इचम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, अंकुश पवार, मनोज घोडके, सत्यम खंडाळे, योगेश लभडे, मिलिंद कांबळे, अमित गांगुर्डे, रोहित उगावकर, संदीप जगझाप यांच्या सह्या आहेत.

शहराची लाईफलाईन असलेल्या सिटिलिंक बससेवा संपावर कोणताही तोडगा निघू शकला नसल्याने सलग पाचव्या दिवशीही बससेवा ठप्प होती. त्याचा मोठ्या प्रमाणात फटका चाकरमाने, शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. मनपा प्रशासनाने टर्मिनेटर लेटर बजावण्याचा इशारा देऊनही ठेकेदार जुमानेसा झाला आहे. दुसरीकडे नवा ठेकेदारासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात नाही तोपर्यंत विद्यमान ठेकेदारावर कारवाई करण्यास मनपास मर्यादा येत आहे. त्यामुळे सिटिलिंक ठेकेदार मनमानी करत अाहे.

महापालिकेने जानेारीपर्यंतचे वेतन आगाऊ अदा करुनही ठेकेदाराने वाहकांचे वेतन थकवले होते. त्यामुळे वाहकांनी मागील महिन्यात कामबंद आंदोलन केले होते. त्यानंतर ठेकेदाराने एक महिन्याचे वेतन अदा करत उर्वरीत वेतन सात मार्चपर्यंत अदा करतो, असे आश्वासन दिल्यानंतर वाहक कामावर परतले. मात्र ठेकेदाराने फ्रेबुवारीचे वेतन अदा न केल्याने सिटिलिंक वाहकांनी मागील गुरुवारपासून (दि.१४) काम बंद आंदोलन केले. मागील सलग पाच दिवसांपासून तपोवन डेपोतून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे सिटीलींकच्या बसवर विसंबून असलेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदाराला मनपा प्रशासनाने अंतिम नोटीस बजावली होती. मात्र मनपा प्रशासन विद्यमान ठेकेदाराला टर्मिनेट करण्याची कारवाई टाळत आहे. नवीन ठेकेदारासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास दोन महिने लागू शकतात. जर विद्यमान ठेकेदाराला अाता लगेच टर्मिनेट केले तर दोन महिने बससेवा ठप्प राहिल. ते पाहता मनपा कारवाई ऐवजी नवीन निविदा प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहे. मनपा प्रशासन लगेच ठेका रद्द करु शकत नसल्याने विद्यमान ठेकेदार मनपाला जुमानेसा झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी