28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeआरोग्यMumbai News : मुंबईकरांच्या डोळ्यांना धोका; वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिलाय मोलाचा सल्ला

Mumbai News : मुंबईकरांच्या डोळ्यांना धोका; वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिलाय मोलाचा सल्ला

बदलत्या हवामानामुळे अनेक संसर्गजन्य आणि साथीच्या रोगांची लागण सुरु होते. कोरोनाच्या रूग्ण संख्येत घट होत असताना आणखी एका आजाराने मुंबईकरांचा घास घेतला आहे.

बदलत्या हवामानामुळे अनेक संसर्गजन्य आणि साथीच्या रोगांची लागण सुरु होते. कोरोनाच्या रूग्ण संख्येत घट होत असताना आणखी एका आजाराने मुंबईकरांचा घास घेतला आहे. गेल्या 2 आठवड्यानपासून मुबंईची देखील काहीशी बिकट परिस्थीती दृष्टीत पडत आहे. लोकांनमध्ये डोळे येण्याची (नेत्रसंसर्ग) साथ मोठ्या प्रमाणत पसरू लागल्याने, मुंबई महापालिका प्रशासनाने काळजी घेण्याच आवाहन केलं. मागील 15 दिवसांत सुमारे 250 ते 300 नेत्रसंसर्गबाधित रुग्णांवर महानगरपालिकेच्या मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले आहेत. नागरिकांना नेत्र संसर्गाची लक्षणे जाणवल्यास त्वरीत औषधोपचार करून घ्यावा अशी मागणी मुंबई महापालिका प्रशासनाने (BMC) केली.

मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी वर्षा रोकडे यांनी नेत्र संसर्गाची माहिती देताना सांगितले की, ‘पावसाळ्यामुळे हवेचा दमटपणा वाढून जे वातावरण निर्माण होत ते संसर्गजन्य रोगांसाठी उत्तम असत. त्यामुळे प्रत्येकवर्षी या दिवसांमधून बाकीच्या आजारांबरोबर कंजक्टीव्हिटीज अर्थात नेत्र संसर्गची साथ पसरते. याआधी नेत्र संसर्ग आजाराचा एखाद दुसरा रूग्ण उपचारांसाठी यायचा, मात्र आता एक दिवस आड रूग्ण आढळू लागले आहेत. तसेच ह्या आजारावर मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयामध्ये मोफत उपचार करून दिला जाईल असे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले आहे.’

हे सुद्धा वाचा

Raj Thackeray : ‘भाजपने अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये’; राज ठाकरेंची पत्र लिहून फडणवीसांना विनंती

Eknath shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील ‘मोस्ट हेट नेम!’; सामनातून मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ

Anil Deshmukh Hearing : ‘वसूलीचे आदेश अनिल देशमुखांनीच दिल्याचे वाझेंनी मान्य केलंय’ सीबीआयचा दावा

ह्या आजारामध्ये पहिल्यांदा एका डोळ्याला लागण होते, त्यानंतर दुसऱ्या डोळ्याला देखील लागण होते. डोळ्यात काहीतरी खुपतय अस वाटत आणि सतत डोळ्यातून पाणी येऊन डोळ्यांचा रंग लाल होतो. डोळ्यांच्या आतल्या बाजूला सूज येते. डोळ्यांना खाज उठते व डोळे जड वाटू लागतात. डोळ्यांमधून एक प्रकारचा तरल पदार्थ बाहेर पडत असतो, ही सगळी लक्षणे डोळ्यांना जाणवू लागतात.

कंजक्टीव्हिटीज हा आजार स्पर्शाने पसरत नसला तरीही तो संसर्गजन्य रोग आहे. योग्य वेळेत उपचार घेतले तर 5-6 दिवसातच हा आजार बरा होतो. एकदा संसर्ग झालेल्या माणसाला पुन्हा डोळे येऊ शकतात त्यामुळे हलगरजीपणा करू नका, स्वच्छता बाळगा आणि स्वताची काळजी घ्या असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. जीवाणूमुळे तसेच विषाणूमुळे डोळ्यांना हा संसर्ग होतो त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण खुप महत्वाची आहे. मुंबईत होण्याऱ्या हवामानातील बदलांमुळे अनेक साथीच्या रोगांना आमंत्रण मिळालय. माणसांन प्रमाणे कुत्र्यांना देखील हा संसर्ग होण्याची शक्यता आढळून येतेय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी