28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeमुंबईRaj Thackeray : 'भाजपने अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये'; राज ठाकरेंची पत्र लिहून...

Raj Thackeray : ‘भाजपने अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये’; राज ठाकरेंची पत्र लिहून फडणवीसांना विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केली आहे.

महाराष्ट्रात सध्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणूकीबाबत विशेष चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्याजागेसाठी आता पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या पोटनिवडणूकीसाठीच शिवसेनेच्या अंतर्गत वाद आणि एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचे चिन्ह गोढवण्यात आलं होतं. त्यानंतर या जागेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपाकडून मुरजी पटेल निवडणूकीच्या मैदानात आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केली आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील ‘मोस्ट हेट नेम!’; सामनातून मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ

Anil Deshmukh Hearing : ‘वसूलीचे आदेश अनिल देशमुखांनीच दिल्याचे वाझेंनी मान्य केलंय’ सीबीआयचा दावा

Prithviraj Sukumaran : सालारमधील सुपरस्टार पृथ्वीराजचा ​​फर्स्ट लुक आऊट! पाहा सुपर सिनेमाचा सुपर पोस्टर

2022च्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे. भाजप आणि ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आता राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी लिहिले, ‘प्रिय देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला विशेष विनंती करून हे पत्र लिहित आहे. अंधेरी पूर्व विधानसभेची जागा आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झाली होती, त्यामुळे तेथे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विधवा त्रतुजा लटके यांनी या जागेवरून उमेदवारी दाखल केली आहे. रमेश लटके यांचा शाखाप्रमुख म्हणून प्रवास सुरू झाला. त्यांचा राजकारणातील प्रवास आणि विकासाचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नीने निवडून यावे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. यासाठी आपण मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा’ अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी फडणवीस यांना लिहीले आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी लिहिलेले हे पत्र त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील शेअर केले आहे. त्यांच्या या पत्रानंतर महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. याआधीही त्यांनी त्यांचा पुतण्या आणि उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे पहिल्यांदा विधानसभा निवडणूकीसाठी उभे राहिले होते. त्यावेळी देखील त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी आजवर अनेकदा असे औदार्य दाखवले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी