31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यनाशिक महापालिकेच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक दिन संपन्न.

नाशिक महापालिकेच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक दिन संपन्न.

नाशिक महापालिकेच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक दिन शहरात दि. १३ फेबुवारी रोजी राबविण्यात आला. नाशिक महानगरपालिकेच्या अटल बिहारी स्कूल,काठे गल्ली,शाळा क्र.४३ मध्ये मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त सेवा,श्रीमती स्मिता झगडे,सहा.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अजिता साळुंखे,विभागीय नोडल वैद्यकीय अधिकारी नाशिक पूर्व डॉ.गणेश गरुड,संत गाडगे महाराज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ पीरजादा आईजा आणि कर्मचारी , व अटल बिहारी वाजपायी शाळेचे मुख्याध्यापिका छाया माळी आणि कर्मचारी उपस्थित होते.यावेळी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी विद्यर्थ्यांना जंतनाशक दिनाचे महत्व पटवून दिले.तसेच ज्या विद्यार्थ्यांना जंतनाशक दिनाच्या दिवशी जंतनाशकाची गोळी राहून गेलेली असेल अशा विद्यार्थ्यासाठी मॉप अप दिन २० फेबुवारी रोजी राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेंर्तगत १ ते १९ वयोगटातील लाभार्थाना अल्बेडेझॉलची गोळी (जंतनाशक) देण्यात आली.१ ते १९ वर्ष वयोगटातील किमान २८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे.बालकांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशातून जंतनाशक मोहीम राबविण्यात येते. बालकांमध्ये आढळून येणारा जंतदोष हा साधारण वाटत असला, तरी त्याचे वाईट परिणाम आरोग्यावर दिसून येतात. जंतदोषामुळे बालकांना अँनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो. शिवाय आतड्यावर सूज येणे, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार, पोटदुखी आदी आजार डोके वर काढतात. हा दोष टाळण्यासाठी बालकांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी देणे गरजेचे आहे. याअनुषंगाने आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोन वेळा विशेष मोहीम राबविली जाते. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे. तसेच बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेऊन १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व शालेय विद्यार्थी यांना शाळा व अंगणवाडीकेंद्र स्तरावर गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्तिथी व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उल्लेख आहे.
ही मोहीम नाशिक मनपा हद्दीतील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी