28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeएज्युकेशननाशिक करंजगाव विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

नाशिक करंजगाव विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

निफाड तालुक्यातील मविप्र संचलित करंजगाव जनता विद्यालय येथे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी गुणगौरव सोहळा मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी रविंद्र मालुंजकर, मविप्र उपसभापती डी.बी मोगल, ईगतपुरी संचालक संदीप गुळवे, निफाड संचालक शिवा पाटील गडाख, शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब पावशे, जेष्ठ नेते धोंडूमामा भगूरे, राज्य बियाणे उपसमिती सदस्य खंडू बोडके-पाटील, मुख्याध्यापक आर.एन राजोळे सर, माजी सरपंच सुरेशबापू राजोळे, बबनराव दराडे यांच्यासह शालेय समिती सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.स्वागतगीताने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

करंजगाव विद्यालयातील सुमारे चाळीस गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. सुप्रसिद्ध कवी रविंद्र मालुंजकर यांनी विविध कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मने जिंकत सामाजिक प्रबोधन केले. संस्थेचे सभासद भिमातात्या राजोळे, कैलास राजोळे, विजय राजोळे यांच्या आर्थिक सहकार्याने निर्माण केलेल्या कर्मवीर उद्यानाचे उद्घाटन सभापती बाळासाहेब क्षिरसागर व संदीप गुळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिथिंच्या हस्ते कर्मवीर उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यालयातील शिक्षकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.एन राजोळे यांनी तर सूत्रसंचालन सुनील जाधव सर यांनी केले. आभार के.डी सानप मानले. यावेळी कार्यक्रमास सरपंच नंदू निर्भवने, उपसरपंच एकनाथ गांगुर्डे, सभासद गणपत भगूरे, सूर्यभान पवार, भरत पगार, नंदू राजोळे, राजेंद्र राजोळे, भीमराव राजोळे, सोमनाथ राजोळे, आण्णासाहेब पवार, पोपट राजोळे, अर्जून भगूरे, वासुदेव जाधव, नवनाथ शिंदे, विष्णू जाधव, संदीप राजोळे, पुंजा देवकर, किरण राजोळे, प्रकाश राजोळे, वसंत राजोळे, कैलास राजोळे, खंडू बोडके पाटील, रविंद्र लोहकरे, शिवलाल कोटकर, समाधान भगूरे, रविंद्र पवार, संतोष पवार, वसंत जाधव, अनिल जोगदंड, चंद्रकांत राजोळे, योगेश पिठे, विजय राजोळे, मंगेश राजोळे, सौ.उषा टिळे, कोमल मत्सागर, सौ.वराळे मॅडम, जोशी सर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करंजगाव विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी बोलताना सभापती बाळासाहेब क्षिरसागर समवेत व्यासपिठावर कवी रविंद्र मालुंजकर, डी.बी मोगल, संदीप गुळवे, शिवा पाटील गडाख, बाळासाहेब पावशे व इतर मान्यवर.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी