28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeआरोग्यनाशिक मनपाकडून आपला दवाखान्याची उद्दिष्ट पूर्ती होईना

नाशिक मनपाकडून आपला दवाखान्याची उद्दिष्ट पूर्ती होईना

राज्य शासनाच्या संकल्पनेतील असलेल्या आपल्या दवाखाना नाशिक शहरात सुरु करण्यासाठी उद्दिष्ट पूर्णतेला खीळ बसली आहे. दरम्यान शहरात 25 ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्याचे उद्दिष्ट असताना अवघ्या 14 ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्यासाठी मनपाच्या हातात जागा आल्या आहेत.आपला दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मासिस्ट आणि एक बहुउद्देशीय सेवक आणि एक सुरक्षारक्षक अशा पाच जणांची टीम कंत्राटी पद्धतीने नियुक्त केली जाणार आहे. शहरात यापूर्वी केद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या पुढाकारातून 106 वर्धिनी केद्र उभारले जाणार आहे.ही आरोग्य वर्धिनी केद्र करता करताच मनपच्या आरोग्य वर्धिनी केद्राचे नाकेनउ आले असताना दुसऱ्या बाजूला राज्य शासनाच्या आपला दवाखान्यासाठी खाजगी जागा भाडेतत्वावर घेउन ते पूर्ण करण्याचे दिव्य आरोग्य विभागाला करावे लागत आहे.

दरम्यान 25 ते 30 हजार वस्तीनजीक दवाखाने असतील. यात मोफत वैद्यकीय सेवा मिळेल. दवाखान्यासाठी भाडेतत्वावर सुमारे एक हजार चौरस फुटाची जागा घेतली जात आहे. त्यात वेटिंग रूम, डॉक्टर रूम, फार्मासिस्ट रूम, नर्सिंग रूम तसेच स्वच्छतागृह या सुविधा राहतील. शासनाकडून एक लाख रुपयांपर्यंत भाडे निश्चित करण्यात आले आहे. भाडेतत्वावर सुमारे एक हजार चौरस फुटाची घेणार जागा घेतली जाणार आहे. त्यात वेटिंग रूम, डॉक्टर रूम, फार्मासिस्ट रूम, नर्सिंग रूम तसेच स्वच्छतागृह या सुविधा राहतील. शासनाकडून एक लाख रुपयांपर्यंत भाडे निश्चित करण्यात आले आहे.

येथे आपला दवाखाना सुरु होणार
मोती चौक सिडको, फाळ्के स्मारक जवळ्, माली गल्ली हनुमान मंदीर वडाळ्गांव, सुदर्शन बंगलो कामठवाडे, वडाळा नाका द्वारका, गोरेवाडी नाशिकरोड, जाधव संकुल अंबड लिंकरोड सातपूर, कारगिल चौक चुंचाळे शिवार, सावली भगवा चौक ना.रोड, शाहू नगर कामठवाडे, अभिवृद्धी शॉपिंग कॉम्प्लेक्स अंजना लॉन्स पार्थडी, साई अकेट तारवाला नगर अमृतधाम, श्रीकृष्ण अपार्टमेंट वडाळा नाका, डॉ. भामरे हॉस्पिटल गोविंद अगर

आपला दवाखान्यासाठी चौदा ठिकानच्या जागा हातात आल्या आहेत. भाडेतत्वावर या जागा घेतल्या जाणार असून दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यत हा दवाखाना सुरु राहील.
-डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकिय अधिकारी, मनपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी