भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुने नाशिक कुंभारवाडा येथे मध्यरात्री दोन अडीचच्या सुमारास 6 ते 7 गाड्यांची जाळपोळ करून दहशत माजवण्याचं प्रयत्न करण्यात आलं आहे.घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या सहा महिन्यांमध्ये कुंभारवाडा मध्ये असे आशा तिसऱ्या तिसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे याआधी दोन दोन मोटरसायकल जाळलेले आहे.काल मध्यरात्री लोक झोपेत असताना अज्ञात व्यक्तींनी कुंभारवाडा भागामध्ये गाड्यांची जाळपोळ केली आहे यामध्ये दोन एक्टिवा एक छोटी लुना दोन मोटरसायकली एक छोटा हत्ती व एक ढकलगाडी जाळण्यात आली आहे या भागांमध्ये दहशतीचा वातावरण निर्माण झाला आहे.
सातत्याने असे प्रकार घडत असल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले आहे या भागातील नागरिकांनी सीसीटीव्ही लावण्याची वारंवार मागणी करूनही या भागात सीसीटीव्ही लागलेला नाही त्यामुळे परिसरात पोलीसग्रस्त वळवावी तसेच टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.