29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeआरोग्यपांढरी अंडी की तपकिरी अंडी, कोणती अंडी आरोग्यासाठी चांगली असतात

पांढरी अंडी की तपकिरी अंडी, कोणती अंडी आरोग्यासाठी चांगली असतात

अंड्यांच्या रंगाचा त्या अंड्याच्या पोषकतत्वाशी संबंध असतो का? सैद तसनीम हसिन चौधरी या न्युट्रिशनिस्ट आणि शकीला फारुख या पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांनी या विषयावर त्यांनी सांगितलं की, अंड्याच्या रंगाचा त्यातील पोषकतत्वावर कोणताही परिणाम होत नाही.न्यूयॉर्कस्थित संशोधकांच्या टीमनुसार, तपकिरी अंड्यांमध्ये ओमेगा-3 फॅटी असिड्सचं प्रमाण किंचित जास्त असतं. मात्र हा फरक खूपच छोटा असतो. त्यामुळे अंड्यांच्या पोषकतत्वामध्ये फारसा फरक पडत नाही. याच मुद्द्याच्या आधारावर असं म्हणता येऊ शकतं की पांढऱ्या आणि तपकिरी, दोन्ही रंगाच्या अंड्यांमध्ये पोषकतत्व आणि गुणवत्ता जवळपास सारखीच असते. त्यामुळं कोणत्याही रंगाचं अंड खाण्यास अजिबात हरकत नसावी.

अंड्यांच्या (Egg) रंगाचा त्या अंड्याच्या पोषकतत्वाशी संबंध असतो का? सैद तसनीम हसिन चौधरी या न्युट्रिशनिस्ट आणि शकीला फारुख या पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांनी या विषयावर त्यांनी सांगितलं की, अंड्याच्या रंगाचा त्यातील पोषकतत्वावर कोणताही परिणाम होत नाही.न्यूयॉर्कस्थित संशोधकांच्या टीमनुसार, तपकिरी अंड्यांमध्ये ओमेगा-3 फॅटी असिड्सचं प्रमाण किंचित जास्त असतं. मात्र हा फरक खूपच छोटा असतो. त्यामुळे अंड्यांच्या पोषकतत्वामध्ये फारसा फरक पडत नाही. याच मुद्द्याच्या आधारावर असं म्हणता येऊ शकतं की पांढऱ्या आणि तपकिरी, दोन्ही रंगाच्या अंड्यांमध्ये पोषकतत्व आणि गुणवत्ता जवळपास सारखीच असते. त्यामुळं कोणत्याही रंगाचं अंड खाण्यास अजिबात हरकत नसावी.(White eggs or brown eggs, which eggs are good for health)

अमेरिकेच्या कृषी विभागानुसार 50 ग्रॅम अंड्यामध्ये 72 कॅलरीज आणि 4.75 ग्रॅम फॅट असतं. पांढऱ्या आणि तपकिरी रंगांच्या अंड्यांमध्ये हे प्रमाण जवळपास सारखंच असतं. ज्या अंड्यांमध्ये ओमेगा-3 चं प्रमाण अधिक असतं, जी अंडी ओरगॅनिक असतात, ओरगॅनिक आणि कृत्रिमरित्या तयार केलेली नसतात म्हणजे नॉन-जीएमओ (नॉन-जेनेटिकली मॉडिफाईड) असतात, फ्री रेंज असतात अशा अंड्यांना बाजारात प्रचंड मागणी असते. इथं अंडी कोणत्या रंगांची आहेत यापेक्षा कोंबड्या कोणत्या प्रकारचं अन्न खातात, कोणत्या वातावरणात वाढतात हे अधिक महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, ज्या कोंबड्यांना ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स किंवा व्हिटामिन-ए किंवा व्हिटामिन-ई असलेला आहार दिला जातो, त्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये अधिक पोषकतत्वं असतात.ज्या कोंबड्यांना ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स किंवा व्हिटामिन-ए किंवा व्हिटामिन-ई असलेला आहार दिला जातो, त्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये अधिक पोषकतत्वं असतात.

देशी किंवा घरगुती कोंबड्यां असलेल्या अंड्यांमध्ये प्रथिने जास्त असतात…
न्युट्रिशनिस्ट सैद तसनीम हसिन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या कोंबड्यांना आहार नैसर्गिक स्वरुपाचा असतो किंवा ज्यांना अधिक पोषण असलेला आहार दिला जातो, अशा कोंबड्यांकडून दिल्या जाणाऱ्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-ए, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, खनिज आणि चरबी अधिक प्रमाणात असते. फ्री-रेंज श्रेणीतील अंड्यांमध्ये व्हिटामिन आणि खनिजांचं प्रमाण कमी असतं मात्र त्यामध्ये प्रोटिन अधिक प्रमाणात असतं. तर चरबीचं प्रमाण कमी असतं.
अर्थात देशी किंवा घरगुती कोंबड्यांना अधिक सूर्यप्रकाश मिळतो. पोल्ट्री तज्ज्ञ शकीला फारुख सांगतात की या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये व्हिटामिन-ए आणि व्हिटामिन-डी चं प्रमाण अधिक असतं.

घरगुती कोंबड्यांच्या तुलनेत चांगलं पोषण किंवा आहार दिलेल्या आणि व्यवस्थित काळजी घेतलेल्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांनी दिलेल्या अंड्यांमध्ये अधिक पोषकतत्वं असतात. कारण या कोंबड्यांना नियमितपणं चांगल्या दर्जाचा आहार दिला जात असतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी