32 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यतंबाखूची तल्लफ थांबवा, अन्यथा जीव गमवा; देशात दरवर्षी होतात 10 लाखांहून अधिक...

तंबाखूची तल्लफ थांबवा, अन्यथा जीव गमवा; देशात दरवर्षी होतात 10 लाखांहून अधिक मृत्यू

तशी किरकोळ वाटणारी तंबाखूची तल्लफ एकदिवस जीवावर बेतू शकते, तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट, खैनी असो की घराघरात तव्यावर जळणारी मिसरी असो, एकदिवस तुम्हाला मरणाच्या दाढेत घेऊन गेल्याशिवाय या व्यसनांची तल्लफ तुम्हाला सोडणार नाही. देशात तंबाखू आणि तंबाखूजण्य पदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. वर्षभरात साधारण 10 लाख जणांचा मृत्यू अशा तंबाखू सेवनाच्या तल्लफेमुळे होत असल्याचे समोर आले आहे. तंबाखूच्या व्यसनाला अटकाव बसावा आणि जणजागृती व्हावी यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जागातिक आरोग्य संघटना 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिन साजरा करत असते.
1 मे 1988 रोजी जागातिक आरोग्य संघटना (WHO) 42.19 ठराव पारित झाल्यानंतर, दरवर्षी 31 मे रोजी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तंबाखू सेवनाने भारतात साधारणत १० लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे दिसून येत आहे.
तंबाखूच्या सेवनामुळे होतात भयंकर आजार
तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.

WHOची काय आहे यंदाची संकल्पना
जागातिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी वेगवेगळी संकल्पना घेऊन येत असते. “आम्हाला तंबाखूची नव्हे तर अन्नाची गरज आहे” ही यावर्षीची संकल्पना आहे. गेल्या वर्षी पर्यावरणाचे रक्षण करा अशी संकल्पना होती. या निमित्ताने दरवर्षी कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात तंबाखू सेवनामुळे होणारे नुकसान आणि त्याची सवय सोडण्याबाबत सर्व प्रकाराची माहिती दिली जाते.

तंबाखूमुळे होणारे नुकसान –
१. तणावात असणे
२. थकवा येणे
३. भूक लागत नाही
४. श्वसनविषयी दाह, फुफ्फुसातील दाह.
५.कर्करोग होण्याचा धोका.
६. घशाचा त्रास.
७.बराच वेळ खोकला.
८.नीट झोप येत नाही
९.कधीकधी खोकल्यामुळे रक्त येणे.

असा आहे तंबाखूचा इतिहास

तंबाखू हे निकोटियाना वनस्पतींच्या ताज्या पानांचे उत्पादन आहे. हे अध्यात्मिक समारंभांमध्ये मदत म्हणून आणि एक मनोरंजक औषध म्हणून वापरले जाते. त्याची उत्पत्ती अमेरिकेत झाली. परंतु जीन निकोट यांनी युरोपमध्ये ओळख करून दिली. फ्रेंच 1559 मध्ये पोर्तुगालचे राजदूत. ते त्वरीत लोकप्रिय झाले आणि एक महत्त्वाचे व्यापारी पीक बनले. 1900 च्या दशकात वैद्यकीय संशोधनाने हे स्पष्ट केले, की तंबाखूच्या वापरामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), एम्फिसीमा आणि कर्करोगाच्या अनेक प्रकारांसह अनेक आजार होण्याची शक्यता वाढते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी