30 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
Homeमहाराष्ट्रIAS प्रभाकर देशमुख यांना ‘कोरोना’ची लागण

IAS प्रभाकर देशमुख यांना ‘कोरोना’ची लागण

टीम लय भारी

मुंबई : निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. माण – खटाव मतदारसंघातील लोकांची चिंता करीत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी देशमुख गावी गेले होते. गावी कार्यकर्त्यांच्या गाडीतून प्रवास करताना त्यांना ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याचे सूत्रांनी सांगितले ( IAS Prabhakar Deshmukh tested positive ).

याबाबत देशमुख यांना संपर्क साधला असता, ‘कोरोना’ची लागण झाल्याचे ते म्हणाले. डॉक्टरांकडून मी उपचार घेतले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरी स्वतःला कॉरन्टाईन करून घेतले आहे. माझी तब्येत आता चांगली आहे. कुणीही काळजी करू नये असे ते म्हणाले. कुटुंबातील सगळ्यांच्याही चाचण्या केल्या आहेत. सुदैवाने इतरांना लागण झालेली नाही असे देशमुख म्हणाले.

गेल्या आठवड्यात प्रभाकर देशमुख गावी गेले होते. लोकांच्या काही अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने त्यांनी म्हसवड व दिवडला भेट दिली होती. दिवडवरून अभय जगताप या कार्यकर्त्याच्या गाडीतून त्यांनी प्रवास केला. त्यानंतर ते पुण्याला आले.

हे सुद्धा वाचा

राजेश टोपेंचे रात्रभर झाले जागरण, साताऱ्यातील दोन गंभीर घटना निस्तारण्यात गेला वेळ

खळबळजनक : शरद पवार, राजेश टोपे यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच सातारा प्रशासनाकडून भयानक घोडचूक

प्रभाकर देशमुख, उत्तमराव जानकरांना आमदारकी द्या; शरद पवारांना चाहत्याकडून रक्ताचे पत्र

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख, विकास लवांडे यांना संधी देण्याची मागणी

प्रभाकर देशमुखांची जिद्द, जनतेच्या स्वप्नातील माण – खटाव घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दिला संदेश

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

चार दिवसानंतर अभय जगताप यांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे निदान झाले. जगताप यांनी देशमुखांना संपर्क साधून याची माहिती दिली. ‘आपण माझ्यासोबत प्रवास केला होता. त्यामुळे तुम्हीही चाचणी करून घ्या’, असा सल्ला जगताप यांनी देशमुख यांना दिला.

त्यानुसार देशमुख यांनी वैद्यकीय चाचणी केली. त्यात दुर्दैवाने त्यांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांना काही लक्षणेही आढळून आली होती. पण उपचारानंतर आता कोणतीही लक्षणे नाहीत.

Mahavikas Aghadi

गावी प्रवासात कुणी संपर्कात आले असतील तर त्यांनी स्वतःला कॉरन्टाईन करून घ्यावे. आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय चाचणी करावी असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान, प्रभाकर देशमुख या आजारातून लवकरच बरे होतील, आणि पुन्हा जोमाने कामाला सुरूवात करतील असा विश्वास त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी