34 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयज्योतिरादित्य शिंदेंनी मराठी लोकांची मने जिंकली

ज्योतिरादित्य शिंदेंनी मराठी लोकांची मने जिंकली

टीम लय भारी

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचा उद्धघाटन सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमात सगळ्यांचे लक्ष वेधले ते म्हणजे केंद्रीय  उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी. शिंदेंनी या कार्यक्रमात मराठीत भाषण करत सगळ्या मराठी लोकांची मने जिंकली आहेत (Jyotiraditya Shinde won the hearts of Marathi people).

महाराष्ट्राशी माझे रक्ताचे आणि कौटुंबिक संबंध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्याचे प्रतिक आहेत. सिंधुदुर्गचा किल्ला हा महाराजांच्या कार्यकाळात तयार झाला होता. आज मला ५०० वर्षांचा इतिहास आठवला. पेशव्यांनंतर शिंदे, होळकर, गायकवाड यांनी कोकणाला स्वतंत्र केले होते. आजचे स्वातंत्र्य हे शिवाजी महाराजांनी दिलेले स्वातंत्र्य आहे. असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

महाविकास आघाडीने दिली ‘महाराष्ट्र बंदची’ हाक

उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना झोडपले, शेलक्या शब्दांत दिल्या कानपिचक्या

तसेच आजचा हा क्षण माझ्यासाठी भावुक क्षण आहे. सिंधुदुर्गच्या या धरतीवर विमानतळामुळे नवीन अध्याय सुरु झाले आहे. तीन दशकांचे हे स्वप्न होते असे ही शिंदे यावेळी म्हणाले. मुख्य म्हणजे हे संपूर्ण भाषण त्यांनी मराठीतच केले होते. त्यामुळे त्यांच्या या भाषणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नवाब मलिकांनी अखेर जाहीर केलं ‘त्या’ भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव!

Jyotiraditya Scindia Discusses VAT Reduction On Air Turbine Fuel With Karnataka CM Bommai

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी