28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रAbdul Sattar : अब्दुल सत्तार हे संस्कार नसलेले आदीमानव!; अनिल गोटे यांचा...

Abdul Sattar : अब्दुल सत्तार हे संस्कार नसलेले आदीमानव!; अनिल गोटे यांचा हल्लाबोल

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी अब्दुल सत्तार हे संस्कार नसलेले आदीमानव आहेत, असा जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी अब्दुल सत्तार हे संस्कार नसलेले आदीमानव आहेत, असा जोरदार हल्लाबोल केला आहे. अनिल गोटे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ‘पचास खोके एकदम ओके’ या योजनेखाली बाहेर पडलेले फितुर, गद्दार, अलीबाबा चाळीस चोर! हे काही राजकारणाचा आदर्शवाद घेऊन आलेले नाहीत. त्यामुळे शिस्त व समाजजीवनातील वास्तव याच्याशी त्यांना काही एक देणे घेणे नाही. हे बेछुट, बेदुंध आहेत. त्यांना फक्त व्यवहार कळतो. त्यांच्यी बुध्दी त्यांच्यापूरती मर्यादीत आहेत. हृदयशुन्य दोन पायाची जनावरे याशिवाय यांच्याबद्द्ल दुसरा शब्द नाही.

अब्दुल सत्तार आज संसदरत्न सौ. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल बोलले उद्या सत्तार भाजप नेत्यांच्या आई बापाबद्दल सुद्धा बोलतील. कारण भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना उघड परवानगी दिली आहे की, ‘आमच्या आई बापाबद्दल बोला! पण आमच्या नेत्याबद्द्ल बोलू नका’ अब्दुल सत्तार सारख्या वाचाळ नेत्यांना लायसन्सच मिळाले आहे, अशी टीका देखील अनिल गोटे यांनी केली आहे.

अनिल गोटे म्हणाले की, शेवटी माणसावर संस्कार आणि जडण घडण महत्त्वाची आहे. पोलीस स्टेशनवर पाळलेला पोपट जसे येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देतो, तसे दारुच्या गुत्त्यावर, हातभट्टीवर, सट्टा, मटक्याच्या पेढीवर जे संस्कार सत्तारांवर झाले, तेच उफाळून बाहेर येत आहेत. याची पूर्ण जाणीव असल्याने व सिल्लोड मतदार संघात काय परिस्थिती आहे? याची इत्यंभूत माहिती असल्यामुळे अब्दुल सत्तार हे ‘अनगाईडेड मिसाईल’ आहे. हीच वेळ आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात टपोरी छाप, गुंड आलेले आहेत. त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. अर्थात एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांचेकडून राक्षसाला जेरबंद करण्याची अपेक्षा म्हणजे ‘पालथ्या घड्यावर पाणी’ होय. ही भूते भाजपवाल्यांनीच बाटलीबाहेर काढली आहेत. शेवटी तेच त्यांचा बंदोबस्त करतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी