27 C
Mumbai
Thursday, June 27, 2024
Homeमहाराष्ट्र35 हजारांची लाच घेताना एसीबीने जात पडताळणी कार्यालयाच्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले

35 हजारांची लाच घेताना एसीबीने जात पडताळणी कार्यालयाच्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले

मुलांचे जात वैधता प्रमाणपत्र काढून देण्यासाठी एका ज्येष्ठ व्यक्तीकडे 35 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लाचखोर कंत्राटी संशोधक सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.25) रोजी रंगेहात पक़डले. जालन्यातील जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात हा प्रकार घडला. राहुल शंकर बनसोडे (वय 43) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तो औरंगाबादमधील मोंढानाका, पंचशिलनगर येथील रहिवासी आहे.

एका 57 वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मुलांनी तजात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडे अर्ज केला होता. मात्र बनसोड़े याने अर्जात त्रुटी असल्याचे कारण देऊन 22 तारखेला 40 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 35 हजार घेण्याचे बनसोडे याने मान्य केले. मात्र लाच देण्याची तक्रारदाराला इच्छा नसल्याने त्यानी जालना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज तक्रार केली.

हे सुद्धा वाचा 
सरकारमध्ये धनगर समाजाचे चार आमदार; त्यांनी समाजाची बाजू मांडावी : राजूशेठ जानकर
दलित महिलेला विवस्त्र करुन सावकाराने तोंडावर केली लघवी; 1400 रुपयांच्या कर्जाचा वाद
भेसळखोरांनो, तुमचे दिवस भरले… मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी उगारला आसूड !

तक्रार प्राप्त होताच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सोमवारी बनसोडे याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राहुल बनसोडे याच्यावर जालना पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी