29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रअहमदनगरचे अहिल्यानगर होणार; शिंदे-फडणवीसांची चौंडीत घोषणा

अहमदनगरचे अहिल्यानगर होणार; शिंदे-फडणवीसांची चौंडीत घोषणा

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर अहमदनगरच्या नामांतराची चर्चेने जोर धरला होता. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर होणार असल्याची घोषणा चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमात केली आहे.

नुकतेच औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव या नामांतरावर केंद्रसरकारने देखील शिक्कामोर्तब केले आहे. महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये या दोन शहरांच्या नामांतराला मंजूरी दिली होती. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने या नामांतराच्या प्रस्तावात काही दुरुस्ती करुन नव्याने प्रस्ताव करुन तो केंद्राकडे पाठवला होता.

हे सुद्धा वाचा

अपचनाची समस्या असेल तर, सावध व्हा; अन्यथा होतील गंभीर परिणाम

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची आता राज्यभर अंमलबजावणी

शिंदे-फडणवीस सरकारने आणले नवे आयटी धोरण; साडेतीन लाख नवे रोजगार निर्माण होणार

दरम्यान गेल्या काही वर्षांपासून अहमदनगरच्या नामांतराची मागणी होत आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांचे नामांतर झाल्यानंतर अहमदनगर शहराच्या नामांतराची मागणी अनेक घटकांकडून केली जात आहे. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनी चौंडी येथे भव्य कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करणार असल्याची घोषणा केली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी