28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeआरोग्यअपचनाची समस्या असेल तर, सावध व्हा; अन्यथा होतील गंभीर परिणाम

अपचनाची समस्या असेल तर, सावध व्हा; अन्यथा होतील गंभीर परिणाम

सततच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आहारात झालेल्या बदलामुळे आपल्याला अपचनाची समस्या जाणवते. अपचनाची समस्या जवळपास सर्वांनाच होत असते. आपल्या पचनसंस्थेशी संबधित ही समस्या आहे. आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक पेप्सिन असते ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. हायड्रोक्लोरिक पेप्सिन अन्नाचे विघटन करते आणि बाहेरील बॅक्टेरियापासून होणारे रोग टाळते. जास्त मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे अपचनाची समस्या जाणवू लागते आणि त्या व्यक्तिला पोटात जळजळ आणि आंबट ढेकर येणे यांचा सामना करावा लागतो. अपचनाची समस्या वारंवार होत असल्यामुळे त्याचे रूपांतर गॅस्ट्रो एसोफेगल रोगामध्ये देखील होऊ शकते. या समस्येमुळे आपल्या दैनंदिन जीवनावर अनेक परिणाम होताना दिसून येतात.


अपचन होण्याची कारणे-

१.जास्त प्रमाणात मसालेदार आणि तेलकट, जंक फूड अशा पदार्थांचे सेवन करणे.
२.अधिक प्रमाणात आंबट पदार्थांचे सेवन करणे.
३.पुरेशी झोप न झाल्याने हाइपर एसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.
४.तणाव आणि चिंता
५.जेवणाच्या अनियमित वेळा आणि खूप उशिरा रात्रीचे जेवण करणे.
६.कॉफी किंवा चहा यांसारख्या कॅफिनयुक्त पेयांचा अति प्रमाणात सेवन करणे.
७.धूम्रपान आणि अल्कोहोल करणे.
८.विविध औषधांचा सतत सेवन करणे.
९.अवेळी झोपणे अशा अनेक कारणांमुळे अपचनाचा त्रास होतो.

अपचनावर घरगुती उपाय –

१. थंड दूध : ॲसिडिटीवर सर्वात उत्तम आणि गुणकारी उपाय म्हणजेच थंड दूध. थंड दूधाचे सेवन केल्याने अपचन तसेच गॅसचा त्रास कमी होतो. हा उपाय वर्षानुवर्षे पचनाशी संबंधित अनेक समस्यांवर उपचारासाठी वापरला जात आहे.

२. नारळाचे पाणी : नारळाच्या पाण्यात भरपूर फायबर असते, हे तुमच्या पचनसंस्थेला चांगली ठेवण्यास मदत करते आणि तुम्हाला घरच्या घरी ॲसिडिटीपासून झटपट आराम मिळवून देते. तसेच दररोज एक ग्लास नारळाचे पाणी पिल्याने छातीत जळजळ कमी होण्यास मदत होते.

३. अद्रक : अद्रक अपचनासाठी उत्कृष्ट आणि नैसर्गिक उपाय म्हणून ओळखला जातो. अद्रक हे छातीत जळजळ आणि अपचनापासून आराम मिळवून देण्यास मदत करते.

४. तुळशीची पाने : जर तुम्ही अॅसिडिटीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधत असाल तर नियमितपणे तुळशीच्या पानांचे सेवन करा. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होऊ शकते.

५. छास : “छास” म्हणजेच “ताक” हे शरीरातील ऍसिड रिफ्लक्स आणि छातीतील जळजळ कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय घरगुती उपचारांपैकी एक आहे. छासमध्ये लॅक्टिक ऍसिड चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे ते पोटातील अॅसिडिटी कमी करण्यास मदत करते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी