27 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार पत्रकारांना म्हणाले तुम्हाला उद्योग नाही, थांबा जरा आता माझं ऐका

अजित पवार पत्रकारांना म्हणाले तुम्हाला उद्योग नाही, थांबा जरा आता माझं ऐका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बेधडक बोलण्यामुळे नेहमी चर्चेत असतात, नुकताच त्यांच्या बोलण्याचा प्रत्यय पुण्यात पत्रकारांना आला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी पत्रकारांचीच उलटतपासणी घेतली. अमित शहा यांनी अजित पवारांचे कौतुक केले त्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पत्रकारांना ते म्हणाले कौतुक केल्याचे तुम्हाला काय वाईट वाटते… तुम्हाला उद्योग नाही, असे अजित पवार म्हणाले.

अमित शहा यांच्या उपस्थितीत सहकार विभागाचा नुकताच पुण्यात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी अजित पवार यांचे भरभरुन कौतुक केले. त्यानंतर अजित पवार यांना याच मुद्द्यावर पत्रकारांनी अमित शहा यांनी कौतुक केल्याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले. तुम्हाला काय वाटते कौतुक केल्याचे.. तुम्हाला उद्योग नाही. थांबा जरा आता माझं ऐका.. ह्यांनी कौतुक केले तुम्हाला काय वाटते, त्यांनी कौतुक केले तुम्हाला काय वाटते… ह्यांनी टीका केली तुम्हाला काय वाटते… आम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी… असे अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा 

बारा बलुतेदारांचे कल्याण होऊ दे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घातले खंडेरायाला साकडे

मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे मोठे पाऊल; तीन माजी महिला न्यायमुर्तींची समिती स्थापन

भरबाजारात कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न  

सहकार आयुक्त कार्यालयाचे स्थलांतर होणार असल्याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी पत्रकाराचीच उलटशाळा घेतली. अजित पवार म्हणाले तुमच्या ज्ञानात ही भर कुणी घातली. कुठली बैठक झाली, कुणी बैठक आयोजित केली कुठले उपसचिव? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. तुझ्याएवढी माहिती मला नाही पण माझी जी माहिती आहे त्यामध्ये सहकार मंत्री हा निर्णय घेत असतात. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आहेत. आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर असे काही करायचे असल्यास वित्त विभागाला ते निधी मागतात माझ्याकडे काही तशी चर्चा झालेली नाही असे अजित पवार यावे्ळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी