28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी महामंडळाच्या मदतीला अजित पवार आले धावून

एसटी महामंडळाच्या मदतीला अजित पवार आले धावून

टीम लय भारी

मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी येत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीचा सामना करता न आल्याने काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एसटी महामंडळाची ही परिस्थिती पाहून त्यांच्या मदतीला अजित पवार धावून आले आहेत (Ajit Pawar came running to the aid of ST Corporation).

कोरोना संकटामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

अजित पवार म्हणाले, आधी मास्तरांना लस देणार; मग शाळा सुरू करणार

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रौप्यपदक विजेता मीराबाई चानू यांचे केले अभिनंदन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश दिल्यानंतर निधी तातडीने वितरित करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे (This has been a great relief to the ST employees).

Ajit Pawar came running to the aid of ST Corporation
अजित पवार यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरित केला

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात 1 रूपये दराने पेट्रोल वाटप

covid-19: When will Maharashtra schools re-open? Here’s what deputy CM Ajit Pawar has to say

चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरीत ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वितरित झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी