मुंबई
लोकसभा(LOKASABHA 2024) निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (AKHANATH SHINDE) व उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांनी जागा वाढवून मागितलेल्या आहेत. विधानसभेला आपल्याला हव्या त्या जागा देऊ मात्र लोकसभेला त्या देता येणार नाही असा पवित्रा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. तुमचाच उमेदवार द्यायचं म्हटलं तर कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल असा दमही यावेळी शहा यांनी दिला असल्याची चर्चा आहे.
हातचे सोडून पळत्याल्याच्या पाठी लागले की काय होतं याचा प्रत्यय आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीअजित पवार यांना येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या 13 खासदार यांना उमेदवारी मिळताना त्यांना नाकी नऊ येत आहे. पवार यांना सुद्धा लोकसभेच्या जागा मागत असताना दमछाक होत आहे.
ईडीची भीती घालून सरकार स्थापन करणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ लोकांनी पुन्हा एकदा ईडीची भीती दाखवत विधानसभेला तुम्हाला जागा देऊ आता काय बोलू नका, असं दम दिला असल्याची चर्चा आहे.
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि शिंदे गट शिवसेना यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा दावाही आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.
LOKASABHA2024;खासदार तुमचेच असतील पण ते कमळाच्या चिन्हावर; भाजपचा शिवसेना -राष्ट्रवादीला दम
विधानसभेला आपल्याला हव्या त्या जागा देऊ मात्र लोकसभेला त्या देता येणार नाही असा पवित्रा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. तुमचाच उमेदवार द्यायचं म्हटलं तर कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल असा दमही यावेळी शहा यांनी दिला असल्याची चर्चा आहे.