मुंबई;
भाजप केसाने गळा कापत आहे असे करू नका, आम्हाला हेतू पुरस्कार त्रास दिला तर माझेही नाव रामदास कदम (ramadas kadam) आहे हे लक्षात ठेवावंं असं आव्हान रामदास कदम यांनी केलं आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून माझ्या मुलाला त्रास दिला जातोय हे घृणास्पद आहे. माझी प्रामाणिक इच्छा आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांची कान पकडले पाहिजेत प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो जे लोक विश्वास ठेवणारे त्यांचा केसाने गळा कापू नका असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे.