28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रलाच मागण्यात महसूल व पोलीस अधिकारी आघाडीवर

लाच मागण्यात महसूल व पोलीस अधिकारी आघाडीवर

टीम लय भारी

मुंबई ( वेब स्काय मीडिया ) : लाच मागणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. सरत्या वर्षात वर्ग एकच्या पाच अधिकार्‍यांवर विभागाने कारवाई केली आहे ( Anti corruption bureau in action mode ).

लाच मागणीमध्ये यंदा महसूल आणि पोलीस विभाग आघाडीवर राहिल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे. सरकारी कामे विनाविलंब व्हावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. परंतु कामे करून देण्यासाठी सरकारी सेवक बेकायदा अपेक्षा ठेवतात. अशा लाचेची अपेक्षा ठेवणाऱ्यांवर एसीबीने या वर्षी मोठ्या कारवाया केल्या आहेत.

लाचेच्या मागणीबाबतची तक्रार आल्यावर मागणी करणार्‍यासह ती स्वीकारणार्‍यावर सर्वसाधारण कारवाई केली जात होती. पण विभागाने लाच मागण्याची प्रवृत्ती मुळासकट मोडून काढण्याचा पवित्रा हाती घेतला आहे. लाच मागणीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या माश्यांसह प्रत्येक घटकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 11 महिन्यांमध्ये विभागाने वर्ग एकच्या पाच अधिकार्‍यांना जाळात पकडले आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसानेच केला महिलेवर बलात्कार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याचे डॉ. बाबासाहेब आंडेकरांना पत्र, वाचा जसेच्या तसे

Divya Bhatnagar : अभिनेत्री दिव्या भटनागरचे कोरोनामुळे निधन

लाच मागणाऱ्यांबाबत अशी करा तक्रार

वर्ग 1 चे पाच अधिकारी अडकले एसीबीच्या जाळ्यात

मत्स्य विभाग, लघुपाटबंधारे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, वैद्यकीय अधीक्षक आणि महावितरण विभागातील वर्ग एकच्या पाच अधिकार्‍यांवर आतापर्यंत लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे.

Mahavikas Aghadi

Anti corruption bureau filed complaint against five officers

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी