33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeआरोग्यनाशिकच्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये जेष्ठांचा स्नेह मेळावा

नाशिकच्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये जेष्ठांचा स्नेह मेळावा

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे जेष्ठांसाठी महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कान नाक घसा तज्ञ डॉ पंकज भट , नेत्र विकार तज्ञ डॉ.प्रियांका भट यांनी उतारवयातील आरोग्यविषयक समस्येवर उपस्थतीत जेष्ठ नागरिकान सोबत संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी केले. आणि माहितीपूर्ण चर्चासत्राला सुरवात करण्यात आली. डॉ. सुशील पारख, मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु आणि बालरोग तज्ज्ञ, यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण केले आणि डोळ्यासोबत कान नाक घसा यांचे आरोग्य जपणे आणि त्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व पटवून दिले.

नाशिक शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष , पदाधिकारी आणि सदस्यांच्या सहभागाने या कार्यक्रमाला भरीव प्रतिसाद मिळाला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात सखोलता आणि नवं मूल्य जोडले गेले , डोळ्याचे व कान नाक घसा या बद्दल लोकांना शिक्षित करण्याचे महत्त्व या चर्चासत्रांमुळे अधिक बळकट झाले. माहितीपूर्ण सत्रांव्यतिरिक्त, कार्यक्रमा नंतर जेष्ठाची मोफत आरोग्य तपासणी उपक्रम हाती घेण्यात आला होता. ज्याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. एकत्रितपणे, सामूहिक प्रयत्नांद्वारे, प्रभावित झालेल्या सर्वांसाठी वेदनामुक्त भविष्य आणि चांगल्या दर्जाच्या जीवनशैलीसाठी प्रयत्न करू शकतो अशी भावना याप्रसंगी उपस्थित जेष्ठानी व्यक्त केली. आभार मार्केटिंग हेड पीयूष नांदेडकर यांनी व्यक्त केले आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले, या आरोग्य संवाद मेळाव्याला ऑपरेशन हेड आशिष सिंग ,डॉ किशोर टिळे , ओपीडी मॅनेजर आरती चव्हाण, यांचे सहकार्य लाभले, या वेळी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल चे डॉक्टर , परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी