27 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023
घरमहाराष्ट्रबाळासाहेब थोरातांनी जनसंवाद यात्रेसाठी निवडले 'हे' एतिहासिक ठिकाण

बाळासाहेब थोरातांनी जनसंवाद यात्रेसाठी निवडले ‘हे’ एतिहासिक ठिकाण

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला वर्ष झाले, त्यानिमित्ताने राज्यात काँग्रेसने ठिकठिकाणी पदयात्रा काढण्यास सुरुवात केली आहे, काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आयुष्यातील 10 वर्षेही तुरुंगात काढली असून त्यापैकी 3 वर्ष ही अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात काढली आहे. यावेळी त्यांनी वास्तव्यात डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला असून ज्या खोलीमध्ये हा ग्रंथ लिहिला. त्या खोली व तुरुंगातील झाडाला अभिवादन करून बाळासाहेब थोरात यांनी जनसंवाद यात्रेची सुरुवात केली.

आपल्याला देश वाचवायचा आहे, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या देशाच्या विकासात योगदान द्यायचे आहे. अत्यंत खात्रीने सांगतो काँग्रेस आणि भारतीय संस्कृतीच देशाला वाचवू शकते. आपण सर्व एक आहोत, कुणीही लहान मोठा नाही, आपल्यात भेदभावाला थारा नाही हा विचार भारतीय संस्कृतीने आपल्याला दिला आणि तोच विचार काँग्रेस पुढे नेण्याचे काम करत आहे, जनसंवाद यात्रा ही प्रेमाचा विचार घेऊन जनमानसात जाणार आहे असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर येथे बोलताना केले.

अहमदनगर येथे झालेल्या जनसंवाद सभेला संबोधित करताना थोरात म्हणाले, देशात सध्या बेरोजगारी महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्त्रि-पुरुष, सर्व जाती, धर्म, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समानतेचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. सर्व जाती धर्माच्या संतांचे विचार राज्यघटनेत असून जो भारताचा नागरिक आहे त्याला मताचा अधिकार दिला आहे. मात्र या लोकशाहीच्या मूलतत्त्वांना सुरुंग लावण्याचे काम सत्ताधारी भाजपा कडून सध्या सुरू आहे. स्वायत्त संस्थांचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. यामुळे लोकशाही टिकणार की नाही हा सध्या देशा पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

थोरात म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, महागाई वाढली आहे त्याबद्दल सरकार शब्द बोलायला तयार नाही. मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवर झालेले अत्याचार अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाच्या आंदोलन करणाऱ्यांवर लाठी चार्ज केला गेला आहे .सत्याग्रहाचा हक्क सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिला खेळाडूंनी आरोप केलेले भाजपाचे खासदार ब्रिज भूषण मोकाट आहे मात्र राहुलजी यांना साध्या बोलण्यावरून दोन वर्षाची शिक्षा सुनावली गेली त्यांची खासदारकी तातडीने काढली गेली.
हे सुद्धा वाचा 
जालना लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मागितली मराठ्यांची माफी!
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिरच्छेद करणारास 10 कोटींचे बक्षिस; संत परमहंस आचार्यांची घोषणा
ट्रेनी एअर होस्टेसची गळा चिरून हत्या; आरोपीने सफाईच्या बहाण्याने केला फ्लॅटमध्ये प्रवेश  

चंद्रयान ही मोहीम शास्त्रज्ञांनी यशस्वी केली. या इस्रो संस्थेची स्थापना पंडितजींनी केली असून काँग्रेस पक्षाने या सर्व संस्थांची पायाभरणी केली आहे. देशात सध्या जाती धर्मामध्ये भांडणे लावायची आणि सत्ता मिळवायची हे भाजपाकडून सुरू आहे. काँग्रेस मात्र सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष असून लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी सर्वांनी काँग्रेसचा विचार घराघरापर्यंत पोहोचवावा असे आवाहनही थोरात यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी