27 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023
घरक्राईमअभिनेत्रीकडे शारीरिक संबंधाची मागणी, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी!

अभिनेत्रीकडे शारीरिक संबंधाची मागणी, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी!

एका 27 वर्षीय अभिनेत्रीला चित्रटपटात काम मिळवून देण्याच्या बदल्यात शाऱीरिक संबध ठेवायला सांगणाऱ्या एका व्यक्तीविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अक्षय उर्फ आकाश राजवीर भुंबक (२९) याला अटक केली, त्यानंतर त्याला जामीनावर सोडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही अभिनेत्री जोगेश्वरी येथे राहते. ती बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या छोट्यास्वरुपातील नोकरी करुन ती उदरनिर्वाह करत आहे. चित्रपटसृष्टीशी संबंधित काही लोकांशी तिची ओळख होती. चित्रपटात काम मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही लोकांच्या दोन तीन व्हॉट्स अॅपग्रुपवर या अभिनेत्रीला अॅड केले होते. यातीलच एका ग्रुमध्ये आरोपी भुंबक देखील होता. त्याने व्हाट्सअॅप ग्रुपमधून तिचा मोबाईल नंबर घेतला आणि तिला फोन केला. त्यानंतर एका कार्यक्रमात तिला काम देण्याचा बहाणा करत त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न देखील केला.

त्यानंतर काही दिवसांनी भुंबकने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यानंतर अभिनेत्रीने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी भुंबकने अभिनेत्रीला फोन करुन तिला एका निर्मात्याचा पत्ता पाठविला आणि त्याच्याकडे जावून तो म्हणेल तसे करण्यास सांगितले.

काही दिवसांनी त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली पण अभिनेत्रीने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. 15 ऑगस्ट रोजी भुंबकने तिला पुन्हा फोन करून एका निर्मात्याचा पत्ता पाठवला. त्याने अभिनेत्रीला निर्मात्याकडे जाण्यास सांगितले आणि तो तिला सांगेल तसे करण्यास सांगितले. जर तू निर्मात्याला खुश केलेस तर त्याच्या चित्रपटात भूमिका मिळेल असे देखील तो म्हणाला. त्यानंतर अभिनेत्री आणि भुंबक यांच्यात वाद झाला. त्याने अभिनेत्रिला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अभिनेत्रीने ओशिवरा पोलि्सांत भुंबकविरोधात तक्रार दाखल केली.

हे सुद्धा वाचा 
जालना लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मागितली मराठ्यांची माफी!
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिरच्छेद करणारास 10 कोटींचे बक्षिस; संत परमहंस आचार्यांची घोषणा
ट्रेनी एअर होस्टेसची गळा चिरून हत्या; आरोपीने सफाईच्या बहाण्याने केला फ्लॅटमध्ये प्रवेश

अभिनेत्रीने नोंदविलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी भुंबक विरोधात भादंवि कलम ५०९, २९५ (अ), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आणि भुंबकला अटक केली. त्यानंतर त्याला अंधेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी