28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंना युवा पदाधिकाऱ्यांचे बर्थ डे गिफ्ट, वाचा सगळ्यात मोठी मोहीम

आदित्य ठाकरेंना युवा पदाधिकाऱ्यांचे बर्थ डे गिफ्ट, वाचा सगळ्यात मोठी मोहीम

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेने एक आगळी वेगळी मोहीम (Campaign) राबवली आहे. खासदार राहुल शेवाळे आणि युवासेनेच्या वतीने युवासेनेच्या सुमारे एक हजार पदाधिकाऱ्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले.

दादरच्या सूर्यवंशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष लसीकरण मोहिमेत (Campaign) खासदार राहुल शेवाळे यांच्यासह आमदार सदा सरवणकर, महापौर किशोरताई पेडणेकर, माजी महापौर- नगरसेविका श्रद्धा जाधव, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, सभागृह नेत्या विशाखा राऊत, युवा सेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, दुर्गा शिंदे, कार्यकारणी सदस्य राहुल कनाल, सुप्रदा फातर्पेकर, नगरसेवक आणि युवासेना कोषाध्यक्ष अमेय घोले, नगरसेवक-युवासेना कार्यकारणी सदस्य समाधान सरवणकर, सुभासिनी मुत्तु तेवर, युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश कदम, मंगल चॅरिटेबल ट्रस्टचे अजित जी, साई हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. खालिद शेख आणि त्यांची टीम, युवासेना पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांवर केली टीका

वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात जे घडलं त्यांची वारीत पुनरावृत्ती होऊ नये; अजित पवार

Covid-19: Chances of third wave very real, says Delhi CM, announces steps to increase oxygen supply

पर्यावरण मंत्री आदित्य (Aditya Thackeray) ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या वतीने युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी विशेष लसीकरण मोहिमेच (Campaign) आयोजन करण्यात आले. या मोहिमेसाठी (Campaign) खासदार शेवाळे यांच्या वतीने सुमारे एक हजार कोविशील्ड लसी उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी साई हॉस्पिटल आणि मंगल चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य लाभले. अशाच रीतीने मुंबईच्या पश्चिम उपनगरातही विशेष लसीकरण मोहीम (Campaign) लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षभरापासून सामन्य जनतेला वैद्यकीय आणि इतर मदत करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कोविड योद्धा म्हणून चोख कामगिरी बजावली. यामुळेच माननीय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, युवासेनेच्या कोविड योद्ध्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी या मोहिमेचे (Campaign) आयोजन करण्यात आले होते.

– खासदार राहुल शेवाळे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी