33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रlokasabha 2024 ; राज्यात भाजपच्या अडचणीत वाढ

lokasabha 2024 ; राज्यात भाजपच्या अडचणीत वाढ

लोकसभेच्या (lokasabha 2024) उमेदवारीवरून राज्यात भाजप (bjp)सद्यस्थितीत अडचणीत असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.लोकसभेला अधिकाधिक जागा मिळाव्यात या उद्देशाने प्रादेशिक पक्षाची फोडाफोड केली असली तरी तेच आता भाजपला डोकेदुखी ठरत आहेत.

प्रशांत चुयेकर

लोकसभेच्या उमेदवारीवरून राज्यात भाजप सद्यस्थितीत अडचणीत असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.लोकसभेला अधिकाधिक जागा मिळाव्यात या उद्देशाने प्रादेशिक पक्षाची फोडाफोड केली असली तरी तेच आता भाजपला डोकेदुखी ठरत आहेत.
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाला आहे त्या 13 खासदारांना सुद्धा तिकीट मिळणार नाही.त्यामुळे उर्वरित खासदार नाराज आहेत.अजित पवार राष्ट्रवादी गटाला सुद्धा आहे त्यापेक्षा जागा वाढवून हव्या आहेत.
शिंदे गटातील खासदारांना तिकीट देणार नाही याची कारणे सुद्धा भाजप नेते स्पष्ट करत आहेत.जनमता मध्ये तुमच्याविषयी नाराज असून तुम्ही निवडून येणार नाही असा अहवाल आहे.असं सांगण्यात त्यांना तिकीट नाकारले जात आहे.
ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांन ा घेऊन भाजपने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला.तेव्हापासून नाराजी आहे ह्यात दुमत नाही.मात्र ते खासदार निष्क्रिय आहे हे सांगणं खितपत सत्य आहे. ते निष्क्रिय आहेत त्यांच्याबद्दल नाराज आहे असं सांगून भाजप आपली चाल पुढे ढकलत आहे.
ईडीची भीती घालून सरकार फोडले असले तरी अजून सुद्धा एडी चा वापर करूनच जागा वाढवून घ्यायचा प्रयत्न भाजप करत आहे.पाठीमागची दोर कापलेले आहेत आता तुम्हाला जायला जागा नाही त्याच्यामुळे एक तर तिकीट कापले जाईल अन्यथा भाजपच्या चिन्हावर तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल असा दमच भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या कडून होत असल्याचे दिसत आहे.
याबाबत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा शिवसेनेचे खासदार भाजपच्या चिन्हावर लढतील असं भाकीत केलं होतं.ते काय चुकीचे नसून तसं वातावरण आहे. शिवसेनेच्या खासदारांचे तिकीट कापले तरी हे भाजपला म्हणावे तितकी सोपे जाणार नाही.आहे त्या खासदारांच त्या त्या मतदारसंघात वजन आहे.त्यांना तिकीट नाकारल्यास ते बंड करतील अन्यथा महाविकास आघाडीला जाऊन मिळतील हे सांगायची आता ज्योतिषाची गरज भासणार नाही.त्यामुळेच भाजपला महाराष्ट्रात अधिकाधिक लोकसभेच्या जागा जिंकणं अवघड झालेले आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये सुद्धा विधानसभेची काय भूमिका असेल. भाजपचा
राष्ट्रवादीला पाठिंबा मिळणार का शिवसेनेला पाठिंबा मिळणार याची अजून खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही.आत्ता आपण निवडून दिलेला खासदार भविष्यात आपल्या विरोधात असेल त्याची कार्यकर्ते आपल्यािरोधात असतील त्यामुळे भाजपला पाठिंबा दिला असला तरी त्याला मत द्यायची का असाही प्रश्न या आमदारांच्या मध्ये पडला आहे.साहजिकच हे मतपेटीतून सुद्धा दिसणार आहे.त्यामुळे येणारी निवडणूक ही भाजपसाठी डोकेदुखी असणार हे 100% त्रिवार सत्य आहे.
कोल्हापूरचे उदाहरण घेतलं तर विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यामधून नाराजी असून त्यांची उमेदवारी बदलणार असल्याची भाजपमध्ये चर्चा आहे.सद्य परिस्थितीत संजय मंडलिक यांची तीन विधानसभा मतदारसंघावरर कमांड आहे.त्यातच त्यांचा स्वतःचा एक गट जिल्ह्यात कार्यरत आहे.त्यांना दुखावल्यास महायुतीची सीट नक्कीच अडचणीत असणार.अशीच परिस्थिती राज्यात सर्वत्र असल्याकारणाने भाजप फोडा जोडा च्या रणनीतीत पडत असला तरी लोकसभेची उमेदवार विजयी करत असताना चांगलाच राडा होणार यात तीळ मात्र ही शंका नाही. युतीमधील राष्ट्रवादी व शिवसेना यामध्ये आतापासून युद्धाला सुरवात झाली आहे. बारामती मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही. देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे. कोणाची मालकी त्यावर नाही. आपला स्वाभिमान जागृत करून लढायचं’ असं सांगत शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय जाहीर केला. अशीच परिस्थिति अनेक मतदार संघात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी