29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसला खासदार चंद्रकांत हंडोरे यांची गरज

काँग्रेसला खासदार चंद्रकांत हंडोरे यांची गरज

माजी सामाजिक न्याय मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलेले खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा आज वाढदिवस.त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

 

माजी सामाजिक न्याय मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलेले खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा आज वाढदिवस.त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

प्रशांत चुयेकर

विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदारकीची संख्या अधिक असून सुद्धा पराभवाला सामोरे जाणारे, मुंबई अध्यक्ष पदाची सुद्धा संधी न मिळालेले चंद्रकांत हंडोरे यांना विविध पक्षांच्या ऑफर आल्या. मूळचे काँग्रेस प्रेमी आणि काँग्रेसवर प्रेम करणारे हंडोरे यांनी भविष्यात कितीही अडचण आली, सत्ता नसली तरी काँग्रेस सोडणार नाही अशी भूमिका घेत काँग्रेसवर प्रेम केलं काँग्रेस वाढविण्यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसलाही हंडोरे यांचा आधार वाटत आहेे. वंचित समाजाला जवळ आणण्यासाठी हंडोरे यांचा पर्याय काँग्रेसला योग्य वाटत आहे‌.

भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राज्यात एक आंबेडकर प्रेमी कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं. दलीत महासंघ, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यामध्ये ते कार्यरत होते. यामुळे राज्यात आजही त्यांच्यावर प्रेम करणारे भीमसैनिक आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भिमशक्ती संघटनेच्या शाखा आहेत. विविध मेळावे घेत त्यांनी राज्यातील कार्यकर्त्यांना एकत्र बांधण्यात यश मिळवले आहे.

एक दिवस आपला असेल असे म्हणत काँग्रेसवर हंडोरे यांनी विश्वास दाखवला. या विश्वासाचे फलित म्हणून काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर संधी दिली. पुन्हा हंडोरे नावाचं पर्व सत्तेत सुरू झालं. थोडीसे निराश झालेले कार्यकर्त्यामध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

राहुल गांधी यांची जवळीकता

सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे जवळचे म्हणून हंडोरे यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसच्या अधिकाधिक उमेदवार निवडून येण्यासाठी, आंबेडकरी जनता महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी हंडोरे यांना सल्ला विचारला जातो.

हंडोरे यांचा राजकीय प्रवास

1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले. इथूनच त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. नगरसेवक म्हणून उत्कृष्ट कामगिरी त्यांनी बजावली. 1992 -93 मध्ये महापौर म्हणून सुद्धा काम केले. 2004 मध्ये चेंबूर मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी घेत आमदार म्हणून सुद्धा निवडून आले. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा उत्कृष्ट काम केले. सध्या ते राज्यसभेवर काँग्रेसचे खासदार म्हणून सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या पत्नी संगीता हंडोरे यांनी चार वेळा मुंबई महानगरपालिकेचे नगरसेविका म्हणून नेतृत्व केले आहे. मुलगी प्रज्योती हंडोरे दक्षिण मध्य मुंबई काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

काँग्रेसलाही हंडोरे यांची गरज

मुंबई महानगरपालिका व राज्यातील सार्वजनिक निवडणुकीत हंडोरे यांचा चांगलाच उपयोग होऊ शकतो. मुंबई सह राज्यातील दलित वर्ग आपल्याकडे राहण्यासाठी काँग्रेस सुद्धा प्रयत्नशील आहे. त्यामुळे काँग्रेसलाही हंडोरे यांची गरज आहे. एकनिष्ठ असल्यानेही त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली.वंचित बहुजन आघाडी मुळेकाँग्रेस पासून दुरावलेला आंबेडकरी चळवतील मतदार पुन्हा काँग्रेसकडे आणण्यासाठी हंडोरे यांच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी