26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रHambirrao Mohite : स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मरणदिनानिमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन

Hambirrao Mohite : स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मरणदिनानिमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन

टीम लय भारी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या कार्यकाळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान सरसेनापती हंबीरराव मोहिते ( Hambirrao Mohite) यांना मिळाला. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या या महान सरसेनापतींच्या स्मरणदिनी उर्वीता प्रॉडक्शन्सच्या वतीने ‘रक्तदान महायज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संदीप रघुनाथराव मोहिते पाटील यांनी दिली.

बुधवार दि. 16 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत कला प्रसाद मंगल कार्यालय, विजयनगर कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे येथे हा रक्तदान महायज्ञ होणार आहे. याप्रसंगी प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित आगामी भव्य, ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’ या मराठी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच पुण्यातील कलाकार सुद्धा रक्तदान करणार आहेत.

या महायज्ञात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास या चित्रपटाचे निर्माते शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांच्याकडून ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या आगाऊ तिकीटांची कृतज्ञतापूर्वक भेट दिली जाणार आहे. या रक्तदान महायज्ञात जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन संदीप रघुनाथराव मोहिते पाटील यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी