25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रCoronaEffect : कोरोना आणि पावसामुळे अंतिम वर्षाची परिक्षा रद्द होण्याची शक्यता!

CoronaEffect : कोरोना आणि पावसामुळे अंतिम वर्षाची परिक्षा रद्द होण्याची शक्यता!

टीम लय भारी

मुंबई : राज्यातल्या अनेक शिक्षण संस्थांच्या इमारती कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर कोव्हिड सेंटर (COVID19) साठी देण्यात आल्या आहेत. ग्रामिण व शहरी भागातल्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आले आहेत. त्यातच जुन-जुलैमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. या पावसामुळे परिक्षा केंद्रांची दुरावस्था होते. त्यामुळे अधिक पाऊस असलेल्या भागात परिक्षा केंद्रासाठी पुर्वतयारी करणेही अवघड आहे.

पदवी आणि पद्वुत्तरच्या परिक्षा जुन-जुलैमध्ये होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र या महिन्यात पावसाळा असतो. काही शिक्षण संस्था तर कोव्हिट सेंटरसाठी (Coronavirus) देण्यात आले आहे. त्यामुळे पुर्वतयारी करणे लवकर शक्य नाही. अधिक पाऊस असलेल्या भागात परिक्षा केंद्रासाठी पुर्वतयारी करणे अवघड आहे, असे मत गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाने राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाला कळवले आहे.

त्यामुळे एका विद्यापीठाची परिक्षा (final year examination) रद्द झाली तर सर्वच विद्यापीठाची परिक्षा रद्द होईल. तसेच 31 मे पर्यंत प्रात्यक्षिक परिक्षा घ्याव्या, असे सांगण्यात आले होते. मात्र इमारती कोरोनाच्या (Coronavirus) सेंटरसाठी दिल्या असल्याने त्या घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या परिक्षा घ्यायच्या की नाही यावर 20 जुनपर्यंत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत निर्णय देतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी