25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus Effect : ‘ईडी’चे मुख्यालय केले ‘सील’; 5 अधिका-यांना कोरोनाची लागण

Coronavirus Effect : ‘ईडी’चे मुख्यालय केले ‘सील’; 5 अधिका-यांना कोरोनाची लागण

टीम लय भारी

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) पाच अधिका-यांना कोरोना व्हायरसची लागण (Coronavirus Effect) झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिका-यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, काल(दि.५) ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिका-यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आले असून उद्यापर्यंत हे कार्यालय सील असणार आहे. तर, कोरोनाची लागण झालेल्या अधिका-यांना आणि त्यांच्या काही कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान, निर्बंध शिथिल केल्यानंतर देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सलग दुस-या दिवशी नऊ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे शुक्रवारी २९५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी इतके मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी