29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रनाशकात परिवहन अँपच्या नावाने सायबर क्राईम

नाशकात परिवहन अँपच्या नावाने सायबर क्राईम

गेल्या काही दिवसांपासून सायबर हॅकर्सनी थेट नाशिक पोलिसांच्या नावे सामान्य नागरिकांना मॅसेज पाठवून सायबर क्राईम करण्यास सुरुवात केली आहे. अशा पद्धतीने आलेल्या लिंकवरून कुठलेही ऍप डाउनलोड करू नये असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली आहे. जवळपास महिनाभरापासून सायबर हॅकर्स हे नाशिक शहरातील अनेक नागरिकांच्या मोबाईलवर ट्राफिक चलान संबंधित फेक मॅसेज व्हायरल करून फेक apk - ‘vahan, parivan.apk अॅप डाउनलोड करण्याबाबत लिंक व्हायरल करीत आहे. हि लिंक ओपन केल्यानंतर ऍप डाउनलोड करण्याची परवानगी मागितली जाते. अनावधानाने हि परवानगी मोबाईल धारकाने दिल्यास त्याच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढली जाण्याचे प्रकार उघड होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सायबर हॅकर्सनी थेट नाशिक पोलिसांच्या नावे सामान्य नागरिकांना मॅसेज पाठवून सायबर क्राईम करण्यास सुरुवात केली आहे. अशा पद्धतीने आलेल्या लिंकवरून कुठलेही ऍप डाउनलोड करू नये असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली आहे. जवळपास महिनाभरापासून सायबर हॅकर्स हे नाशिक शहरातील अनेक नागरिकांच्या मोबाईलवर ट्राफिक चलान संबंधित फेक मॅसेज व्हायरल करून फेक apk – ‘vahan, parivan.apk अॅप डाउनलोड करण्याबाबत लिंक व्हायरल करीत आहे. हि लिंक ओपन केल्यानंतर ऍप डाउनलोड करण्याची परवानगी मागितली जाते. अनावधानाने हि परवानगी मोबाईल धारकाने दिल्यास त्याच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढली जाण्याचे प्रकार उघड होत आहे.

याबाबत काही जागरूक नागरिकांनी पोलीस आयुक्तांनी दिलेल्या व्हाट्स ऍप क्रमांकावर याबाबत तक्रार केली असता याबाबत नाशिक पोलिसांकडून अशा प्रकारची कुठलीही लिंक देण्यात येत नसल्याचे सांगितले आहे. तसेच, अशा लिंक आल्यास त्यापासून सावध राहण्याचे आवाहन देखील केले आहे.

फेक संदेश – “Dear Vehicle owners / Drivers, This is to inform you that you have been issued a traffic challan for the above mentioned violation, Challan No. MH19080549482489, Vehicle Registration No. MH15GW** to confirm your identity and view the evidence related to this violation pleas install the vahan parivahan app. The app will provide you with the necessary details including the photo evidence of the violation sincerely Nashik Traffic Police”

गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे च्या माध्यमातून नागरिकांना गंडा घालण्यात आला आहे.  फेक आप बनवून नागरीकांची फसवणूक करण्याची नविन युक्ती सायबर हॅकर्सव्दारे केली जात आहे. त्यास नागरीकांनी बळी पडु नये तसेच नागरीकांची फसवणुक होवु नये याकरीता पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांचे कडुन असे आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे नाशिक ट्राफिक पोलीसांकडुन कसुरदार वाहनधारकांना व्हॉट्स अॅपवर मॅसेज पाठवला जात नसुन कोणत्याही प्रकारचे एपीके अॅप डाउनलोड करण्याबाबत सांगण्यात येत नाही. ईचलान संदर्भात काही अडचणी असल्यास सहायक पोलीस आयुक्त कार्यालय, शहर वाहतूक शाखा, जुने पोलीस आयुक्त कार्यालय, शराणपुर रोड, नाशिक शहर येथे समक्ष संपर्क साधावा. असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी