लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. शिर्डी, नगरचे पदाधिकारी येऊन गेलेत. पुढे ठरवू काय करणार कारण अजून निवडणुकीला वेळ आहे. राज्यात सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होत आहे मात्र . कुठे आणि का निवडणूक लढवावी याबाबत चाचपणी करत आहोत. सत्ताधारी पक्षही चाचपणी करत आहेत, आम्हीही करतोय असे मनसे नेते राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच टोल वसुलीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार असल्याचे ते म्ह्नणाले. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलवसुलीवरुन संताप व्यक्त केला . माझा विरोध टोलला नाही तर टोलवसुलीला आहे . कारण टोलवसुलीतून येणारा पैसा राज्य सरकारकडे जातो की खासगी व्यक्तीच्या खिशात याबाबत पारदर्शकता असली पाहिजे.
मी पैसे देत आहे, तर ते सरकारला गेले पाहिजेत. त्यातून सरकार नव्या योजना करु शकेल. पण ते टोलवाल्याच्या खिशात जास्त असतील तर मला आवडणार नाही. त्या पैशांचा वापर राजकीय पक्षासाठी केला जात असेल तर तुम्हाला आव़डेल का? पारदर्शकता नसेल तर त्याला विरोध करायला नको का? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. रुग्णवाहिका, प्राथमिक उपचार केंद्र, खड्डे याबाबत दिलेल्या आश्वासनाचं काय झालं. टोलनाक्यावरुन पुढे गेल्यावर खड्डे असतील तर मी टोल कशासाठी भरला हे मला कळू तर दे. कोकणातला रस्ता पूर्ण नाही, पण टोल लावतात याचा अर्थ काय. ट्रान्सहार्बर लिंकवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं आहे, ते सगळ्या टोलनाक्यांवर वापरा. पण इतकी वर्षं सुरु असून यात काळंबेरं आहे हे लक्षात येत नाही का? टोलचा महसूल राज्य सरकारच्या किती आणि खासगी व्यक्तीच्या खिशात किती जातो हे तपासायला नको का?,असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते आले. यावर राज ठाकरे यांनी यांच्याकडे कोण जाईल, मुळात हि आताची आघाडी आहे ती कधी फुटेल याची माहिती नाही. यांचा काही भरवसा नाही कोण जाईल यांच्याकडे? इंडिया आघाडीत नितीश कुमारही होते, ते कुठे गेले? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला .मी अयोध्येत जाणार आहे, गर्दी कमी झाल्यानंतर मी जाईन. मी काळाराम मंदिरातही जाणार आहे यापूर्वीही अनेकदा गेलो आहे. असे राज ठाकरे म्हणाले.
मराठी शाळा बंद होत आहेत याबद्दल बोलताना मी यापूर्वी एकदा शासनाला सांगितले होते कि थोडे सेमी इंग्लिश दिल्याशिवाय मराठी शाळा चालणार नाहीत. कारण प्रत्येक पालकाला वाटते कि आपल्या मुलाला इंग्लिश आले पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले. ईडी कारवाईबाबत बोलताना कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही त्यामुळे आज भाजप जे करत आहे तेच उद्या इतर सत्तेत आलयावर करतील असे होईल. त्यामुळे अशाप्रकारच राजकारण भाजपला शोभत नाही. इंदिरा गांधी यांनी केले म्हणून तुम्ही कार्याचे हे चुकीचे आहे असे ठाकरे म्हणाले. श्रीरामाचा गजर करून भाजप सत्ता मिळवेल का यावर राज ठाकरे यांनी प्रतेक निवडणूक हि वेगळी असते कुणाला माहीत होते कि कांद्यावर निवडणूक होतील. त्यामुळे आता काय होईल याचा अंदाज बंधने कठीण आहे.
जे मोठ्या प्रमाणात मतदान झाले ते बाबरी मशीद विषयी च्या रागाचे झालेले मतदान होते असेच असेच२०१४ ला देखील झाले होते . मात्र एखादी गोष्ट पूर्ण झाल्यावर काय परिणाम होतो हे सांगता येत नाही. राम मंदिर झाल्याचा आनंद आहे पण मी भाजपचा मतदार नाही असेदेखील लोक आहेत.
मराठा आरखनाबाबद्दल बोलताना जरंगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या फक्त आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.जरांगे पाटील यांना मी भेटलो . तेव्हा सांगितले होते कि हे होणार नाही कारण अशा प्रकारचा निर्णय कोणतेही राज्य सरकार घेऊ शकत नाही. कारण हाच प्रश्न सर्व राज्यात आहे. मराठा समाजाच्या बांधवांनी विराट मोर्चे काढले आहे . आता दुसऱ्यांदा मुंबईत आले. हा कोणाचा राजकिय अजेंडा आहे आणि कोण तुम्हाला घेऊन जातंय याचा विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे यांना जरांगे पाटील भेटले. भेट झाली आणि बाहेर पडले आता त्यांचा कोणता विजय झाल्यावर ते बाहेर पडले आणि जे झालेलं नाही त्याचा विजय कसा होऊ शकतो. आणि विजय झाला असेल तर आता परत उपोषण कशासाठी असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
गटबाजी सत्तेत असताना कोणालाही दिसत नाही मात्र विरोधी पक्ष असताना पटकन दिसते.
विधानसभा आणि मनपा निवडणूक येऊ द्या मग सर्व पक्षातील गटबाजी समोर येईल .आमची गटबाजी दिसते कारण आमचा उघडा कारभार आहे असे राज ठाकरे म्हणाले.
मलाही ऑफर आल्या होत्या
राजकीय पक्षांच्या निधीसाठी हे पैसे वापरले जात असल्यासंबंधीच्या डेटासंबंधी विचारण्यात आलं असता राज ठाकरेंनी मलाही ऑफर आल्या होत्या असा गौप्यस्फोट केला. “मलाही ऑफर आल्या नव्हत्या असं वाटतं का? जे आले होते त्यांना इथंच मारीन असं म्हटलं होतं. परत टोलवर जाताही येणार नाही असे राज ठाकरे म्हणाले.