29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रपुणेकारांची लाडकी 'डेक्कन क्वीन' झाली ९३ वर्षांची

पुणेकारांची लाडकी ‘डेक्कन क्वीन’ झाली ९३ वर्षांची

टीम लय भारी

पुणे: गेली ९२ वर्षे पुणे – मुंबई हा रोजचा प्रवास करणारी डेक्कन क्वीन (Deccan Queen) आज ९३वा वाढदिवस साजरा करत आहे. पुणे रेल्वे स्थानाकावर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस करण्यात आला आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्षे वाढदिवशी डेक्कन क्वीन रेक मुंबई यार्डातच होती. Deccan Queen celebrates 93nd birthday

याप्रसंगी इंजिनचं पूजन करत ट्रेन चालकाचा सत्कारदेखील करण्यात आला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने गाडीला छान सजवण्यात आले आहे. या गाडीसोबत प्रवाशांचं खास असं नातं आहे. त्यामुळे ‘डेक्कन क्विन’चा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

दररोज हजारो प्रवासी या ट्रेनने प्रवास करतात. पुणे – मुंबईतील हजारो प्रवासांसाठी सोयीची अशी ही गाडी आहे. ही गाडी एका दिशेने १९२ किलोमीटर अंतर धावते. पुणे-मुंबई शहराला जोडण्यासाठी एक जून १९३० रोजी डेक्कन क्वीनची सेवा सुरू करण्यात आली. त्याला आता ९३ वर्षे पूर्ण झाली आहे.

ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीने पहिली ‘लक्झरिअस सेवा’ म्हणून पुणे-मुंबई मार्गावर डेक्कन क्वीनची सेवा सुरू केली होती. ही पहिली डिलक्स ट्रेन होती आणि तिला पुण्याचे नाव देण्यात आले होते. ज्याला ‘दख्खनची राणी’ (‘दख्खन की रानी’) असेही म्हटले जाते.

हे सुद्धा वाचा: 

एकच धून सहा जून! रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांची QR कोडच्या माध्यमातून गैरसोय टळणार

Breaking News HIGHLIGHTS | Jack Dorsey Steps Down From Twitter Board, Confirms Elon Musk

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी