27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयसोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस

सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस

टीम लय भारी 

दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (sonia gandhi) आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (rahul gandhi) यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. Sonia, Rahul Gandhi get ED notices National Herald case

या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदे घेत या प्रकरणावर भाष्य केले आहे. भाजप हे सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

त्यांनी म्हटले की, आम्ही या प्रकरणाचा न घाबरता सामना करणार असून, सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. आठ जूनपर्यंत राहुल गांधी परतल्यास तेही चौकशीला सामोरे जातील. नॅशनल हेराल्ड हे प्रकरण 2015 मध्ये तपास यंत्रणेने बंद केले सिंघवी यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : 

पुणेकारांची लाडकी ‘डेक्कन क्वीन’ झाली ९३ वर्षांची

Sonia And Rahul Gandhi Summoned By Enforcement Directorate For Questioning

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी