32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रदिनकर पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची आग्रही मागणी....

दिनकर पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची आग्रही मागणी….

माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना नाशिक लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी त्याचा भाजपला संपुर्ण महाराष्ट्र मध्ये फायदा होईल यासाठी अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी महामंडळ हे भाजप नेत्यांची भेट घेणार असल्याचे भाजप आध्यात्मिक आघाडी जिल्हाप्रमुख निवृत्ती महाराज रायते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे पदाधिकारी उपस्थीत होते.सातपूर येथे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात आज ही पत्रकार परिषद झाली. यावेळी बाळासाहेब महाराज शिरसाठ, निवृत्ती महाराज चव्हाण, संजय महाराज शिंदे, भास्कराचार्य महाराज रसाळ, लोणारकर, वाऱ्हेराज बाबा पातोरकर, भाईमुनी बाबा महानुभाव, अतुल महाराज आदी उपस्थित होते.

माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना नाशिक लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी त्याचा भाजपला संपुर्ण महाराष्ट्र मध्ये फायदा होईल यासाठी अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी महामंडळ हे भाजप नेत्यांची भेट घेणार असल्याचे भाजप आध्यात्मिक आघाडी जिल्हाप्रमुख निवृत्ती महाराज रायते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे पदाधिकारी उपस्थीत होते.सातपूर येथे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात आज ही पत्रकार परिषद झाली. यावेळी बाळासाहेब महाराज शिरसाठ, निवृत्ती महाराज चव्हाण, संजय महाराज शिंदे, भास्कराचार्य महाराज रसाळ,जनार्दन महाराज काकडे, सुभाष महाराज जाधव, कैलास महाराज घुगे, गोकुळ महाराज तपकिरे, गजानन राठोड ,शांताराम खांदवे, सुनील निघोट, सजन महाराज फड, महंत कृष्णराज बाबा मराठे, महंत सायराज बाबा लोणारकर, वाऱ्हेराज बाबा पातोरकर, भाईमुनी बाबा महानुभाव, अतुल महाराज आदी उपस्थित होते.

यावेळी रायते यांनी सांगितले की, नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेकदा वारकरी संप्रदाय आणि त्यांचे प्रचारक येत असतात. ज्यांच्याकडे आम्ही नेहमी हक्काने जातो असे आमच्या सर्वांचे बंधू दिनकर पाटील गेल्या ४० वर्षापासून अनेक धार्मिक सामाजिक कार्य सर्व प्रश्न सोडवतात. त्यामुळे आमच्या दोन्ही संप्रदाय तथा पंथाची इच्छा आहे की, त्यांना लोकसभेची भाजपने उमेदवारी द्यावी. महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय आता दिनकर पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे. केवळ नाशिक लोकसभा मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमची प्रचंड संख्येने मते आहेत .त्यामुळे आमच्या दोन्ही संप्रदायाच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पाठिंबा पत्रे नाशिक जिल्हाध्यक्ष यांना दिली आहेत .तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेणार असून त्यांना अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विव्दांस शामसुंदर शास्त्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश बोधले महाराज यांच्या स्वाक्षरीचे या संदर्भातील पत्र देण्यात येणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचे प्रत्येकी २ ते ४ लाख अनुयायी जिल्हयामध्ये आहेत . पक्षाने उमेदवारी जाहीर करताच त्याचा फायदा भाजपाला होणार आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय भारतात ही एकमेव जागा अधिकारवाणीने मागत आहे असे ही ते म्हणाले. दिनकर पाटील यांनी धर्मसेवेचे व्रत हाती घेतले आहे त्यामुळे त्यांना भाजपने उमेदवारी द्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले.
याप्रसंगी भाईदेवमुनी महानुभाव, निवृत्ती बाबा रायते, महंत कृष्णराज बाबा मराठे, भास्कराचार्य महाराज रसाळ यांनीही यासंदर्भात आपले मत व्यक्त करीत दिनकर अण्णा पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी केली. दिनकर पाटील यांना लोकसभा उमेदवारी का द्यावी याची अनेक कारणे आहेत ,कारण अनादी काळापासून धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आली तेव्हा तेव्हा रामराज्य संकलपणा अस्तित्वात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज,पांडवांनी सुध्दा धार्मिक अधिष्ठान ठेवून काम केले .दिनकर पाटील यांनी कोरोना काळात अनेकांना मदत केली आहे.ते चुकीच्या माणसांना कधीही थारा देत नाहीत.भाजप कडून त्यांना उमेदवारी मिळाली तर त्याचा फायदा शेजारच्या मतदार संघाला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रल होऊ शकतो.याचा विचार करू योग्य तो न्याय देऊन दोन्ही संप्रदायाच्या वतीने ही पत्रकार परिषद घेण्यात आली असल्याचेही महंतांनी सांगितले.
दिनकर पाटील यांचे जे जे कार्य आहे ते लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर आहे .अनेक पंथाचे धर्माचे मंदिर त्यांनी उभारले असून त्यांचे सुमारे २ते ४ लाख अनुयायी नाशिक जिल्ह्यात आहेत असे ते म्हणाले. मानवता हाच एक धर्म दिनकर पाटील यांचा आहे.भास्कर महाराज रसाळ यांनी भक्ती आणि शक्ती एकत्र आल्यास काय होऊ शकते हे राम मंदिर निर्माण झाल्यावर सर्वांना दाखवून दिले आहे. दाखवून दिले कारण गेली ५०० वर्षे प्रलंबित प्रश्न सोडवला गेला आहे, असे सांगीतले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी