27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, आई तुझी खूप आठवण येते

डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, आई तुझी खूप आठवण येते

टीम लय भारी

मुंबई :-  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरूवारी टाटा रुग्णालयाचे आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत एक पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा ते हळवे झाले आणि त्यांना त्यांच्या आईची आठवण आली. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, माझी आहे कॅन्सरची बळी ठरली. २३ मार्चला होळीच्या दिवशी कॅन्सर डिटेक्ट झाला आणि २६ एप्रिला तिच निधन झाल. काही वेळ देखील मिळाला नाही असे डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, आई तुझी खूप आठवण येते असे म्हणत ते भावूक झाले.

टाटा रूग्णालयात राज्यासह देशभरातून हजारो रूग्ण येत असतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकद्या रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागल्याचे आपण पाहिले किंवा ऐकले असेल. पण आता ती वेळ येणार नाही. कारण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने आपले १००  प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणाच आज जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यावेळी टाटा रुग्णालयापासून ५  मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजीकासम चाळ परिसरातील म्हाडाचे १००  फ्लॅट्स टाटा रुग्णालयाला देत असल्याचे आव्हाड यांनी जाहीर केले. दरम्यान, आव्हाड यांनी ही संकल्पना काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानंतर आज हा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.

कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही’

कॅन्सरग्रस्तांचे नातेवाईक फूटपाथ, कोपऱ्यावर कुठेही झोपलेले असतात. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने म्हाडाचे १००  प्लॅट्स टाटा कॅन्सर सेंटरला देत आहोत. पुढे ही संख्या २०० होईल. प्लॅट्स देण्याचा विचार आणि निर्णय ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ७ दिवसांत झाली याचा गर्व असल्याचे यावेळी आव्हाड म्हणाले. म्हाडाने प्लॅट्सच्या चाव्या दिल्यानंतर आता सर्व जबाबदारी ही टाटाचे असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी