27 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रया कारणामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत; राऊतांचा टोला

या कारणामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत; राऊतांचा टोला

टीम लय भारी

मुंबई :- भाजपच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी ही सरकारवर आरोप केले आहेत. यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडवणवीस यांना टोला दिला आहे. तसेच, ते पत्र खरेच परमबीर सिंह यांनी लिहिले आहे का?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थिती केला आहे.

संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले आहे. गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे परमबीर सिंह यांनी लिहलेल्या पत्राची चौकशी करा अशी मागणी केली होती. यावर बोट ठेवत संजय राऊत यांनीही ‘चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या,’ असे म्हणत फडणवीसांवर टोला लगावला आहे.

‘चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे. विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळेच कदाचित ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत. विरोधी पक्षनेत्याने त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असे वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसते याचे भान प्रत्येत विरोधी पक्षनेत्याने ठेवले पाहिजे,’ असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे. शिवाय, वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचे हसे होते, लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, राज्यपाल आज नियोजित दौरा असल्याने देहरादूनला गेल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट टळली आहे. यावर ही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल सध्या खूप व्यस्त असतात, त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ आहे की नाही हे पण मला माहिती नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, मुख्यमंत्री आणि कॅबिनेटनी पाठवलेल्या १२ आमदारांच्या नावांचा राज्यपाल आभ्यास करतायत का? अभ्यास करुन पीएचडी करणार का?, असे ही त्यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी