28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रगोपीचंद पडळकर शेर, त्यांचे कार्यकर्ते सव्वाशेर !

गोपीचंद पडळकर शेर, त्यांचे कार्यकर्ते सव्वाशेर !

टीम लय भारी

मुंबई : गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्या विरोधात जोरदार पडसाद उमटले. असे असले तरी पडळकरांचे कार्यकर्ते मात्र आपल्या नेत्याचे जोरदार समर्थन करीत आहेत ( Gopichand Padalkar’s supporter’s agitation ).

Mahavikas Aghadi

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांची संभावना ‘महाराष्ट्राला लागलेला कोरोना’ अशी केली होती ( Gopichand Padalkar’s controversial statement ) . हे विधान योग्यच असल्याचे पडळकर यांचे कार्यकर्ते ठासून सांगत आहेत. इतकेच नव्हे तर, काहीजणांनी तर ‘पडळकर हेच महाराष्ट्रातील कोरोनावरील औषध आहेत’ अशा शब्दांत तारे तोडले आहेत.

गंगाखेड येथील ‘धनगर साम्राज्य सेने’चे अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी तर ‘ गोपीचंद पडळकर हे एसटी आरक्षणामध्ये खोडा घालणाऱ्यांचा सुपडा साफ करणारे सॅनिटायझर आहे’ असे वक्तव्य केले आहे.

गोपीचंद पडळकर शेर, त्यांचे कार्यकर्ते सव्वाशेर !
जाहिरात

पडळकरांच्याही पुढे एक पाऊल टाकून हे कार्यकर्ते विधाने करीत असल्याचे सोशल मीडियामध्ये दिसत आहे. सांगली, बारामती, कोल्हापूर, परभणी, नाशिक, सातारा, सोलापूर इत्यादी ठिकाणचे कार्यकर्ते पडळकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.

हे कार्यकर्ते केवळ मैदानात उतरून थांबले नाहीत, तर शरद पवार, अजितदादा, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्यावरही विखारी टीका करीत आहेत ( Gopichand Padalkar’s activist scathing to Sharad Pawar, Ajit Pawar, Jayant Patil, Jitendra Awhad ) .

MoneySpring

पडळकर यांच्या विधानाचा धनगर समाजातील नेते अनिल गोटे, उत्तमराव जानकर, सक्षणा सलगर यांनी जोरदार समाचार घेतला आहे. या तिन्ही नेत्यांवरही पडळकर यांचे समर्थक तोंडसुख घेताना दिसत आहेत. पडळकरांवर जे टीका करतील त्यांच्यावर उलट वार हे कार्यकर्ते करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांवर आरोप करण्यासाठी गोपीचंद पडळकर, महादेव जानकर हे फडविणासांनी वापरलेले नेते : उत्तमराव जानकर

गोपीचंद पडळकरांनी टीका केली ते बरेच झाले, पवारांचा ‘खरा’ चेहरा समोर आला

गोपीचंद पडळकरांची भूमिका ‘मोडेन पण वाकणार नाही’

राष्ट्रवादीने नाद सोडला

गोपीचंद पडळकरांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना काय करायचे आहे ते करू द्या. पडळकर हे फार मोठे नेते नाहीत ( Gopichand Padalkar isn’t mass leader ) . भाजप त्यांना वापरून घेत आहे. अण्णा डांगे, अनिल गोटे, राम शिंदे, महादेव जानकर यांना भाजपने जसे वापरून फेकून दिले, तसे एक दिवस पडळकरांनाही फेकून देतील.

गोपीचंद पडळकर शेर, त्यांचे कार्यकर्ते सव्वाशेर !

पडळकरांना त्यांच्या कर्माची फळे मिळतील, त्यामुळे त्यांना कसे नाचायचे आहे तसे नाचू द्या. पडळकर एवढे मोठे नेते असते तर, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत एकदाही कसे निवडून आले नाहीत. उलट त्यांचे सपाटून पराभव झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको. त्यांच्यावर टीका करून त्यांना मोठे करायला नको अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी