33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये मंदिर प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा

नाशिकमध्ये मंदिर प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा

माणिक नगर परिसरातील नागरिकांनी बांधलेले महादेवाचे मंदिर पोलिसांनी दबाव टाकून तोडल्याचा आरोप करत उपनिरीक्षक बदलीच्या मागणीसाठी परिसरातील शिव भक्त अंबड पोलीस ठाण्यात या मांडून बसले होते.याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात एका तक्रारीवरून माणिक नगर येथील भाजी मार्केट परिसरात पोलीस पोहोचले. सदरहू परिसराच्या बाजूला असलेले तेथील रहिवाशांनी बांधलेले महादेवाचे मंदिर हे तेथील नागरिकांना दबाव आणून तोडायला लावण्यास भाग पाडल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. तसेच गुन्हे शाखा पथकाचे उपनिरीक्षक नाईद शेख यांनी येथील नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

माणिक नगर परिसरातील नागरिकांनी बांधलेले महादेवाचे मंदिर पोलिसांनी दबाव टाकून तोडल्याचा आरोप करत उपनिरीक्षक बदलीच्या मागणीसाठी परिसरातील शिव भक्त अंबड पोलीस ठाण्यात या मांडून बसले होते.याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात एका तक्रारीवरून माणिक नगर येथील भाजी मार्केट परिसरात पोलीस पोहोचले. सदरहू परिसराच्या बाजूला असलेले तेथील रहिवाशांनी बांधलेले महादेवाचे मंदिर हे तेथील नागरिकांना दबाव आणून तोडायला लावण्यास भाग पाडल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. तसेच गुन्हे शाखा पथकाचे उपनिरीक्षक नाईद शेख यांनी येथील नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.याप्रकरणी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून डिबी चे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख यांच्या निलबनाच्या जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी अंबड पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु नाईद शेख यांच्या निलंबनाची मागणी मात्र त्यांनी लावून धरली.याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी