27 C
Mumbai
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक छोट्या छोट्या गोष्टीत आनंदीं जीवनाची गुरुकिल्ली : डॉ. पाटील

नाशिक छोट्या छोट्या गोष्टीत आनंदीं जीवनाची गुरुकिल्ली : डॉ. पाटील

ज्येष्ठांनी निरामय जीवन जगण्यासाठी सरळ सोप्या गोष्टींना आत्मसात करून सातत्य राखणे गरजेचे आहे. मुख्यत्वे दैनंदिन आहार हलका असावा, रनिंग ऐवजी वॉकिंग आणि विशेष म्हणजे ज्या गोष्टीत आनंद मिळेल त्या गोष्टी आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन लाईफ केअर हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राकेश पाटील यांनी केले. लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे आयोजित मासिक सभेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना डॉ. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंचचे अध्यक्ष रंजनभाई शाह, सचिव रमेश डहाळे, देवराम सैंदाणे, भा.रा.सुर्यवंशी, जितेंद्र येवले उपस्थित होते.

ज्येष्ठांनी निरामय जीवन जगण्यासाठी सरळ सोप्या गोष्टींना आत्मसात करून सातत्य राखणे गरजेचे आहे. मुख्यत्वे दैनंदिन आहार हलका असावा, रनिंग ऐवजी वॉकिंग आणि विशेष म्हणजे ज्या गोष्टीत आनंद मिळेल त्या गोष्टी आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन लाईफ केअर हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राकेश पाटील यांनी केले.
लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे आयोजित मासिक सभेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना डॉ. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंचचे अध्यक्ष रंजनभाई शाह, सचिव रमेश डहाळे, देवराम सैंदाणे, भा.रा.सुर्यवंशी, जितेंद्र येवले उपस्थित होते.

यावेळी डॉ. पाटील म्हणाले की, जसे जसे वय वाढत जाते तशी तशी प्रतिकार शक्तीचे कार्य कमी कमी होत जाते. यासाठी ज्येष्ठांनी नियमीत रक्तातील साखरेचे प्रमाण, ब्लड प्रेशर, इसीजी यासारख्या रूटीन तपासण्या करणे गरजेचे असते. तसेच सकस आहार व दैनंदिन सकाळी ४५ मिनिटे चालणे त्याचप्रमाणे सकारात्मक विचारातून आनंद शोधत राहिल्यास नक्कीच आनंदी जीवन जगण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. राकेश पाटील यांच्या हस्ते सभासदांचा वाढदिवसानिमित्त भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंचचे सचिव रमेश डहाळे यांनी ज्येष्ठांसाठी राबवित असलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. सभेेचे सुत्रसंचालन विठ्ठल सावंत यांनी केले तर उपस्थितांना स्वागत जितेंद्र येवले यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी