29 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्याची केंद्राकडे २००० सशस्त्र पोलिसांची मागणी 

राज्याची केंद्राकडे २००० सशस्त्र पोलिसांची मागणी 

लय भारी टीम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर कामाचा ताण पडत आहे. २५ मे रोजी रमझान ईद आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय शसस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) २० कंपन्यांची २००० हजार सशस्त्र पोलिसांची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांवरील ताण वाढत चालला आहे. राज्यात राज्य राखीव पोलीस दलाचे ३२०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्या मदतीने राज्यात सध्या पोलीस दल कार्यरत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यातच येत्या काळात रमाझान ईदचा सण आहे. त्यादृष्टीनं राज्यात कायदा सुव्यवस्था राखणं आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात तातडीनं केंद्रीय शसस्त्र दलाचे २००० पोलीस कर्मचारी म्हणजेच २० कंपन्या पाठवाव्यात,” अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली आहे.

 

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी