27 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रमला हाकलण्याची गरज नाही मी आधीच राजीनामा दिला आहे: छगन भुजबळ

मला हाकलण्याची गरज नाही मी आधीच राजीनामा दिला आहे: छगन भुजबळ

मराठा आरक्षणावरून शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले. त्याला भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भुजबळ यांनी गायकवाड हे माझ्याबद्दल जे अपशब्द वापरले ते ऐकून वाईट वाटले. त्यांनी भाषा जरा जपून वापरली पाहिजे. ते म्हणाले होते की, कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रीमंडळाबाहेर काढा. मला मंत्रिमंडळाबाहेर काढायचे की ठेवायचे, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे.ते रविवारी नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते.या घटनेनंतर भुजबळ यांनी स्वतः च मी १६ नोव्हेंबर रोजी माझा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्याचा गौप्यस्फोट केला.

भुजबळ यानी सांगितले की, मंत्रिमंडळातील मंत्र्यांना भूमिका पटत नसल्याने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून राजीनामा दिला आहे असे छगन भुजबळ यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजीच दुपारी १२ वाजता छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर येत आहे.

भुजबळ यांनीच ओबीसी एल्गार सभेतून तसा मोठा गौप्यस्फोट केला आहे. यानंतर १८ नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यासंदर्भात बैठक घेतली. दरम्यान, त्याच दिवशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून हा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती सरकारकडून करण्यात आली आहे असे भुजबळ म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी