28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रइंदिरानगर बोगद्याची लांबी होणार वीस हून छत्तीस मिटर खा. गोडसे

इंदिरानगर बोगद्याची लांबी होणार वीस हून छत्तीस मिटर खा. गोडसे

इंदिरानगर,राणेनगर,दिपालीनगर,लेखानगर या महामार्ग लगतच्या भागातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बोगद्यांच्या लांबी वाढविण्याच्या कामाची नॅशनल हायवे प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. इंदिरानगर येथील बोगद्याची लांबी वीसहून छत्तीस मिटर तर राणेनगर येथील बोगद्याची लांबी सत्तावीस वरून चौरेचाळीस मीटर इतकी होणार आहे. येत्या तीन महिन्यात निविदा विषयीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असून, पुढील दोन वर्षात बोगद्याची लांबी,रुंदी वाढवण्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती खा.हेमंत गोडसे यांनी दिली आहे.सिडको आणि नाशिक शहर यांना जोडणारे हे दोनही बोगदे आहेत. बोगद्याचा वरील बाजूस महामार्ग असून बोगदयांना समांतरही महामार्ग आणि दोन्ही बाजूस सव्हिसरोड आहेत.

या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. यावर मार्ग काढण्यासाठी खा.गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल हायवे प्रशासनाने बोगद्यांची लांबी आणि रूंदी वाढविण्यासाठी विशेष आराखडा तयार केला. सदरचा आराखडा मंजूर होवून या कामी निधी उपलब्ध होण्यासाठी खा.गोडसे यांनी वेळोवेळी केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. यातूनच ना.गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वीच सत्तेचाळीस कोटीच्या निधीला मान्यता दिलेली आहे. खा. गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांना यश आले असून नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर भाऊसाहेब साळुंखे,टेक्निकल मॅजेजर दिलीप पाटील यांच्या अभिपत्याखाली बोगद्यांची लांबी आणि रुंदी वाढविण्याच्या कामाचे निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

यावर मार्ग काढण्यासाठी खा.गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल हायवे प्रशासनाने बोगद्यांची लांबी आणि रूंदी वाढविण्यासाठी विशेष आराखडा तयार केला. सदरचा आराखडा मंजूर होवून या कामी निधी उपलब्ध होण्यासाठी खा.गोडसे यांनी वेळोवेळी केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. यातूनच ना.गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वीच सत्तेचाळीस कोटीच्या निधीला मान्यता दिलेली आहे. खा. गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांना यश आले असून नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर भाऊसाहेब साळुंखे,टेक्निकल मॅजेजर दिलीप पाटील यांच्या अभिपत्याखाली बोगद्यांची लांबी आणि रुंदी वाढविण्याच्या कामाचे निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

निविदासाठी बारा फेब्रुवारी पर्यंत मुदत

निविदा दाखल करण्याची मुदत बारा फेब्रुवारी २०२४ पर्यंत असणार आहे.आलेल्या निविदांची छाननी आणि त्यानंतर प्रशासकीय बाबींची पूर्तता करून घेवून मे महिन्यात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.इंदिरानगर येथील बोगद्याची लांबी दोन्ही बाजूंनी आठ -आठ मीटरने वाढणार असून एकूण लांबी छत्तीस मीटर इतकी होणार आहे.रुंदी दहा मीटरहून पंचवीस मीटर होणार आहे. राणेनगर येथील बोगदयाची लांबी यापूर्वी सत्तावीस मीटर इतकी होती.आता दोन्ही बाजूंनी आठ -आठ मीटर वाढवून एकूण लांबी चौरेचाळीस मीटर इतकी होणार आहे. दोन वर्षात काम पूर्ण होणार असून या ठिकाणी कोंडीमुक्त वाहतूक होन्यास मदत होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी