27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशाळा महाविद्यालयाच्या परिसरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करा मनसे

शाळा महाविद्यालयाच्या परिसरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करा मनसे

शनिवारी नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने डॉ सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.नाशिक शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयां परिसरातील टवाळखोरांचा उपद्रव,तरुणींची छेडछाड व दामिनी पथक नेमण्याबाबत तसेच अवैध पान मसाला,गुटखा विक्री करणारे यांचा बंदोबस्त करण्याबाबत चर्चा करण्यात आली,नाशिक शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाच्या परीसरात रोज टपोरी,टवाळखोर मुलांचा वावर वाढला असून त्यामुळे शाळा,महाविद्यालयात परिसरात छेडछाडीच्या घटना घडत आहे, येणाऱ्या,जाणाऱ्या विद्यार्थिनीना शाळा,महाविद्यालयात जाणे अवघड होतं आहे,परंतु ही गोष्ट घरी जर सांगितली तर घरचे शाळा,महाविद्यालयात जाणे बंद करतील म्हणून विद्यार्थिनी घाबरत शाळा, महाविद्यालयात जात आहे.

शनिवारी नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने डॉ सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त
यांना निवेदन देण्यात आले.नाशिक शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयां परिसरातील टवाळखोरांचा उपद्रव,तरुणींची छेडछाड व दामिनी पथक नेमण्याबाबत तसेच अवैध पान मसाला,गुटखा विक्री करणारे यांचा बंदोबस्त करण्याबाबत चर्चा करण्यात आली,नाशिक शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाच्या परीसरात रोज टपोरी,टवाळखोर मुलांचा वावर वाढला असून त्यामुळे शाळा,महाविद्यालयात परिसरात छेडछाडीच्या घटना घडत आहे, येणाऱ्या,जाणाऱ्या विद्यार्थिनीना शाळा,महाविद्यालयात जाणे अवघड होतं आहे,परंतु ही गोष्ट घरी जर सांगितली तर घरचे शाळा,महाविद्यालयात जाणे बंद करतील म्हणून विद्यार्थिनी घाबरत शाळा, महाविद्यालयात जात आहे.

नाशिक शहरा मध्ये विद्यालयांजवळ टवाळखोरांचा उपद्रव,तरुणींची छेडछाड व शाळा कॉलेज जवळ पान टपरी असल्या मुळे तरुणांना लागत असलेली व्यसने या मुळे पालक त्रस्त झाले आहेत.विद्यालय व कोचिंग क्लासेस,कॉलेजेस बाहेर टवाळखोरांचा उपद्रव,तरुणींची छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. कॉलेज, शाळा सुटल्या नंतर तरुणींचा पाठलाग करणे,अश्लिल हावभाव करणे यामुळे पालक त्रस्त झाले आहे, शाळा ,कॉलेज व कोचिंग क्लासेस जवळच्या परिसरात पान टपरी , बिअर वाईन शॉप चे दुकाने असल्यामुळे शाळकरी व कॉलेजेस मधील युवक सिगारेट ,गुटखा व तंबाखू चे व्यासंधीं होत आहे,गांजा, MD ड्रग्स विक्री ची शक्यता नाकारता येत नाही.आणि आता शहरात अवैध गुटखा,M D नशा करणार्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी या नशेच्या आहारी जात आहेत त्यामुळे ते गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असून त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे,शाळा व महाविद्यालय परिसरात रोज दामिनी पथक फिरले पाहिजे,तसेच या ठिकाणी पोलीस क्यूआर कोड लावून त्याची नियमित तपासणी केली पाहिजे, सर्व शाळा व महाविद्यालयात महिला सुरक्षा हेल्पलाईन नंबर दर्शनी भागात लावण्यास सांगितले पाहिजे तसेच शाळा व महाविद्यालया परिसरातील सर्व वाईन व बियर शॉप पण बंद केले पाहिजे यामुळे विद्यार्थिनी सुरक्षित राहून निर्भीडतेने शाळा,महाविद्यालयात जाऊ येऊ शकतात, तरी आमची मनसे विद्यार्थी सेनेची आपणास विनंती आहे की आपण या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी,धन्यवाद.

असे आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी मनसे विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर,प्रदेश कार्यकारणी सदस्य बाजीराव मते, जिल्हाध्यक्ष मनोज गोवर्धने, उपजिल्हाअध्यक्ष नितीन धानापुणे, शहर अध्यक्ष ललित वाघ,शहर उपाध्यक्ष अमोल भालेराव, विभागअध्यक्ष मेघराज नवले, अजिंक्य देवरे,गणेश शेजुळ,अविनाश जाधव,नील रदळ,दर्शन बोरसे,सर्वेश सुर्वे,गौरव निकम,निखिल गोडसे, रोहित जाधव,प्रफुल्ल चव्हाण,ऋतिक तुपसमुद्रे,शुभम रोकडे,वेदांत बोडगिरे, दर्शन बागुल,मोहित पाटील, मयूर जैन, मयूर पाटील,प्रसाद घुमरे आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी