31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमाहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक अजय आंबेकर घोटाळा करून अमेरिकेत पळायच्या तयारीत

माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक अजय आंबेकर घोटाळा करून अमेरिकेत पळायच्या तयारीत

टीम लय भारी

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. अनेक मुद्यांवरून सभागृह गजबजून निघाले. त्यात कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी महत्त्वाचे घोटाळ्यांवर भाषण करत सभागृहाचे लक्ष वेधले. राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक अजय आंबेकर यांच्या विरोधात मागच्या २ वर्षांपासून ओम ऍडव्हटाईझींग व राकेश ऍडव्हटाईझींग या जाहिरातदार कंपन्यानी जाहिरात न करता खोटे प्रमाणात सादर करून शासनाचे करोडो रुपये लुटले आहे(Information, public relations director prepares to flee to US).

यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये शासनाने गुन्हा देखील दाखल केला आहे.  या घोटाळ्यामध्ये अजय आंबेकर आणि काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. संचालक अजय आंबेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. स्वेच्छानिवृत्ती घेत आंबेकर आता अमेरीकेत पलायन करत असल्याचा दावा देखील ठाकरे यांनी यावेळी केला.

व्हॉट्सअ‍ॅपवर वर्तमानपत्रे शेअर करणाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दणका; ग्रुप बंद करण्याचे दिले आदेश!

ऊसतोड कामगार महामंडळाचे कार्यालय पुणे व परळीत साकारणार, 3 कोटी रुपये निधी वितरित : धनंजय मुंडे

अजय आंबेकर यांच्या विरोधात डिपार्टमेंटल चौकशी देखील झाली होती. या दरम्यान त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. शासनाला  त्याच्या विरोधात कारवाई करायची आहे. माहिती व जनसंपर्क विभागात गेल्या चार ते पाच वर्षात बेसिल नावाच्या कंपनीने कोणताही कार्यादेश नसताना  करोडो रुपये घेतले अशा अनेक प्रकरणांचा उलघडा आंबेकरांच्या चौकशीतून झाला. बेसिल कंपनीवर फैजदारी खटला दाखल झाला आहे. तात्कालीन संचालक आंबेकर यांच्या डीईची मागणी देखील करण्यात आली होती.

धक्कादायक: भरल्या ताटावरच पोलीस उपनिरीक्षकाची प्राणज्योत मालवली

Uddhav government to defy Governor order, hold Maharashtra Speaker poll

अजय आंबेकरांविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु मागील १ महिन्यापासून या प्रकरणावर FIR दाखल झालेली नाही. याचाच फायदा घेऊन आंबेकरांनी अमेरिकेत पलायन केले आहे. आंबेकर साहेबांनी रिटायरमेंट घेऊनसुद्धा माहिती जनसंपर्काच्या कार्यरत येऊन सियार लिहत होते, याची क्लिप आपल्याकडे आहे.

आंबेकर जिथे कुठे असतील तिथून त्यांना पकडून आणण्याची व्यवस्था करावी. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात लवकरात लवकर फौजदारी खटला दाखल करावा अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी सभागृहात केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी