27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री जयंत पाटलांचे पाय जमिनीवर, पूरग्रस्तांच्या समस्या घेतल्या जाणून

मंत्री जयंत पाटलांचे पाय जमिनीवर, पूरग्रस्तांच्या समस्या घेतल्या जाणून

टीम लय भारी

सांगली :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील हे आज पूरग्रस्तांच्या भेटीला गेले होते. पूरग्रस्त भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे समजते (Knowing that Minister Jayant Patil took up the issue of flood victims).

वाळवा तालुक्यातील बहे, हुबालवाडी, बोरगाव या पूरग्रस्त गावांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत तेथील नागरिकांना धीर दिला. हाहाकार माजवलेल्या पावसाने आज उसंत घेतली असली तरी पाण्याचा निचरा झालेला नाही असे जयंत पाटील यांनी सांगितले.

अशोक चव्हाण यांनी सर्वपक्षीय खासदारांना लिहिले पत्र

मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू, नितेश राणेंचा आरोप

सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पाणी शिरले होते. कुठेही जीवितहानी होऊ नये यासाठी लोकांचे स्थलांतर करण्यात आले. तसेच पुराच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी स्थलांतरित करण्यात आलेल्या लोकांची अँटीजन टेस्ट केली जात आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले (Jayant Patil said that antigen test is being done on the migrants).

Jayant Patil took up the issue of flood victims
जयंत पाटील

नाना पटोले देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवणार

Flood situation in Sangli, Satara and Kolhapur alarming: Jayant Patil

मुसळधार पावसामुळे वाळवा आणि शिरगाव येथील जनजीवन विस्कळित झाले होते. नदीच्या पाण्याची पातळी वाढली की शिरगाव गावाचा संपर्क तुटतो. गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या तर्फे मिळालेल्या बोटींच्या साहाय्याने 600 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी प्रशासन आणि नागरिक एकजुटीने कार्य करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी