28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री जयंत पाटील यांनी दुचाकी , ट्रॅक्टरमधून केला प्रवास , पुरग्रस्तांचे गाऱ्हाणे...

मंत्री जयंत पाटील यांनी दुचाकी , ट्रॅक्टरमधून केला प्रवास , पुरग्रस्तांचे गाऱ्हाणे घेतले ऐकून

टीम लय भारी

सांगली :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी आज सांगली येथील पूरग्रस्त गावांना भेट दिली होती. विशेष म्हणजे पूरग्रस्तांच्या समस्या जाण्यासाठी जयंत पाटील यांनी दुचाकी आणि ट्रॅक्टरमधून प्रवास केला. आज सकाळी ८:३० वाजल्यापासूनच त्यांनी हा पाहणी दौरा सुरू केला होता. (Jayant patil traveled on two wheeler and tractor)

त्यांनी वाळवा तालुक्यातील शिगाव येथील नदीला आलेल्या पुराची पाहणी केली. तसेच मिरज तालुक्यातील दुधगाव , कसबे डिग्रज येथे पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. पुरामुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे का याची जयंत पाटील यांनी स्वतः चौकशी केली. (Vaalva river flooding situation)

छगन भुजबळांची पुरग्रस्तांसाठी ‘मोठ्या मदती’ची घोषणा

Jayant
जयंत पाटील यांनी दुचाकी , ट्रॅक्टर तर कधी बोटीने प्रवास करत पूरग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेट

मंत्री जयंत पाटील यांनी दुचाकी , ट्रॅक्टरमधून केला प्रवास , पुरग्रस्तांचे गाऱ्हाणे घेतले ऐकून

मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू, नितेश राणेंचा आरोप

जयंत पाटील यांनी दुचाकी , ट्रॅक्टर तर कधी बोटीने प्रवास करत पूरग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेट देत नागरिकांचे मनोबल वाढवले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी सांगली जिल्ह्यातील अनेक पूरग्रस्त गावांचा आढावा घेतला. तब्बल १२ तास उलटून गेले तरी हा दौरा सुरूच आहे.आतापर्यंत जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील जवळपास १५ पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या आहेत. (Boat, two wheeler and tractors being used to visit places Jayant)

मंत्री यशोमती ठाकूर धावल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी

Maha flood fury: Over 100 killed, thousands evacuated; CM visits affected areas

पूरग्रस्त भागांची पाहणी करत असताना जयंत पाटील हे झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवण व पाण्याची व्यवस्था करत आहेत . करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबीयांची अँटीजन टेस्ट करून खबरदारी घेण्यात येणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी