26 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरमहाराष्ट्रजेजुरी गडाचा होणार जीर्णोद्धार; ३४९ कोटी ४५ लाखांचा खर्च

जेजुरी गडाचा होणार जीर्णोद्धार; ३४९ कोटी ४५ लाखांचा खर्च

राज्याचे  कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराया. विवाह झाल्यावर नवदाम्पत्य जेजुरीला जाऊन खंडोबाचे दर्शन घेतात. अशा या जेजुरी गडाचा जीर्णोद्धार करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. तीर्थक्षेत्र जेजुरीसाठी सुमारे ३४९ कोटी ४५ लक्ष रुपयांचा श्री क्षेत्र जेजुरी गड विकास आरखडयास  २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार सध्या जेजुरी गडावर पहिल्या टप्प्यातील पहिला भागात होणारी विकासकामे सुरू आहेत. सुमारे अडीचशे वर्षांनंतर जेजुरी गडाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार होताना दिसत आहे.

राज्य सरकारने जेजुरीचा विकास करण्यासाठी श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. या आराखडयात अंतर्गत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती ग टित करण्यात आली आहे. या समितीच्या अंतर्गत पुण्याचे जिल्हाधिकारी सनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण विकास आराखड्यातील कामांची देखभाल अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

७ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला आहे. सनियंत्रण अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने जेजुरी गडावरील विकासकामांना सुरुवात केली आहे. सध्या जेजुरी गडाची संपूर्ण तटबंदी, आतल्या ओवयांचे दगडांचे क्लिनिंग सुरु आहे. तर, मुख्य गाभाऱ्यातील  दगडांना मूळ स्वरूप देऊन सुशोभीकरण केले जात आहे. संपूर्ण गडकोट हा मूळ स्वरूपात दिसणार आहे.

तीन टप्प्यात होणार विकास
आराखड्यानुसार जेजुरी गड च परिसराचा संपूर्ण विकास तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. या विकास आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात भाग २ मधून मुख्य खंडोबा मंदिर आणि इतर सहायक संरचनासह संपूर्ण तटबंदीचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी ११ कोटी २२ लाख १६ हजार ७३३ रुपयांची तरतूद केली आहे. तर, मंदिरावरील व पायरी मार्गावरील दीपमाळांची जतन व दुरुस्तीसाठी ११ कोटी ३५ लाख २५ हजार ४३१ रुपये आणि १२ कोटी २७ लाख ४४ हजार ७९३ रुपयांची तरतूद आहे.

त्याचबरोबर होळकर तलाव, पेशवे तलाव आणि इतर जलकुंड तसेच पायऱ्या असलेल्या शहरातील विहिरी याचे जतन व दुरुस्तीसाठी अकरा कोटी ८१ लाख ५१ हजार ७९८ रुपयाची तरतूद आहे. कडेपठार येथील खंडोबा मंदिर आणि इतर सहायक संरचना यांचे जतन, दुरुस्ती करण्यासाठी २२ कोटी ५६ लाख २३ हजार १३६ रुपये आणि शहरातील पुरातन मंदिराचे जतन व दुरुस्ती त्याचबरोबर मल्हार गौतमेश्वर मंदिर, लवथळेश्वर मंदिर व बल्लाळेश्वर मंदिर याच्यासाठी दोन कोटी दोन लाख ९९ हजार आणि कडेपठारच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही मार्गाच्या बाजूच्या संरचना पाय यांचे जतन व दुरुस्ती करण्यासाठी १० कोटी ७३. लाख ८२ हजार रुपये तरतूद आहे.

तीन कमानी, दोन वापरात असलेल्या आणि एक बानुबाई मंदिराजवळील याचा समावेश आहे. यानंतर टप्पा क्रमांक एक या दुसऱ्या भागामध्ये परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये मूलभूत पाया सुविधा, विद्युत सोयी, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मल निःसारण आणि पाण्याचा पुनर्वापर योग्य वायू विजन प्रणाली, मंदिर परिसरातील धूळ गोळा करण्यासाठी संत्री आणि घनकच्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सुमारे पाच कोटी १५ लाखांची तरतूद शासनाने केली आहे.

हे सुद्धा वाचा
लालबागचा राजा गणेशोत्सवात चेंगराचेंगरीमध्ये महिला-बालकांचे शोषण
सोलापूर शहरात हातभट्टी दारूला लगाम! राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठिकठिकाणी धाडसत्र..
मंत्रालयात शुकशुकाट, कर्मचाऱ्यांची मज्जाच मजा

मंदिरातील कर्मचायांच्या सुविधा विश्वस्त व पाहण्यासाठी बसण्याची व्यवस्था, माहिती व चौकशी कक्ष पुजारी सेवे कन्यांसाठी व्यवस्था, रोजये सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन, आदीसाठी सुमारे १२ कोटींची तरतूद आहे. या संपूर्ण टप्प्याच्या विकासासाठी शासनाकडून १०९ कोटी ५७ लाख १६ हजार रुपये मंजूर केले असून या विकास कामांची कामे आता युद्धपातळीवर सुरु आहेत.

जेजुरी खंडोबा गड आणि शहरातील विविध विकासकामे सुरु झालेली आहेत. अंजुरीतील सर्वधार्मिक या ऐतिहासिक स्मारकांचे जतन दुरुस्तीचे काम नियोजनबद्ध केले जाणार आहे. ही कामे २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे. यादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे तरी या कामादरम्यान थोडीफार गैरसोय झालीच तरीही सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी केले आहे.

घटस्थापना पूर्वीच मंदिरातील गाभाऱ्याचे काम पूर्ण होणार

अडीचशे वर्षांनंतर कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी गडाचा एकप्रकारे जीर्णोद्धार होत आहे. याचा सर्वांनाच मोठा आनंद होत आहे. जेजुरी गड़ नव्या रूपात समोर येणार आहे. यातील मुख्य प्रश्न आहे तो मुख्य गाभायाचा. ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

पुढील महिन्यात २४ ऑक्टोबर रोजी दसरा उत्सव आहे. २५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत आहे. त्यापूर्वी मंदिरातील गाभाऱ्याचे काम पूर्ण होणार आहे तोपर्यंत भाविकांना थोड्या असुविधा राहतील मात्र ग्रामस्थ, भाविक, पुजारी सेवेकान्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी